कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

कर्नाटकव्याप्त मराठी प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबई :  कर्नाटकव्याप्त मराठी प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त त्यांनी अभिवादन संदेश प्रसारित करून आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सीमालढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मादिनी विनम्र अभिवादन करत आहे. सीमाप्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मी मानाचा मुजरा करतो. कर्नाटकव्याप्त मराठी भाषक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. 

संबंधित बातम्या