"कर्नाटकची एक इंच जमीनही महाराष्ट्राला देणार नाही"

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

“कर्नाटकची एक इंच जमीनही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही,असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केलं आहे.

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन संदेश प्रसारित करताना कर्नाटकव्याप्त मराठी प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला होता. यालाच उत्तर देताना “कर्नाटकची एक इंच जमीनही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही,असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्नाटक सीमा वादावर भाष्य करताना “मराठी प्रदेश महाराष्ट्रात  समाविष्ट व्हावा यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सीमालढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनी विनम्र अभिवादन करत आहे. सीमाप्रश्नात सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे आणि त्यांची निष्ठा, समर्पणात होरपळूनही या लढ्यात धीराने सहभागी असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना मी मानाचा मुजरा करतो. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांना आदरांजली असणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत”, असं प्रतिपादन केलं होतं. 

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; न्यायप्रविष्ठ प्रकरणात मीडिया ट्रायल घेतल्यास न्यायालयीन अवमानाची कारवाई करु

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर बेळगावात याचा निषेध करत  निदर्शनं करण्यात आली होती, तसंच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या, जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.

संबंधित बातम्या