महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ व १५ डिसेंबरला नागपूरऐवजी मुंबईत होणार 

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे.

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधान भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या