महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

‘महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाच्या जागतिक संसर्गाचा सामना करत असताना, हे सरकार कधी पडणार याचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा काल समाचार घेतला.

मुंबई : ‘‘महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाच्या जागतिक संसर्गाचा सामना करत असताना, हे सरकार कधी पडणार याचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा काल समाचार घेतला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने बोलावलेल्या चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका मांडली. कोरोनाच्या साथीमुळे हे अधिवेशन दोन दिवसांत मुंबईतच उरकले जाणार आहे. यामध्ये शोक प्रस्ताव, पुरवणी मागण्या आणि अध्यादेश व काही विधेयके असे मर्यादित कामकाज केले जाणार आहे.

संबंधित बातम्या