Maharashtra: अमृता फडणवीस यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेला अटक

Amruta Fadnavis: महिलेविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisDainik Gomantak

Amruta Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ठाण्यातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी फेसबुकवर बनावट प्रोफाईलचा वापर केला होता. तिला आता 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेचं (Woman) नाव स्मृती पांचाळ असल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे पोलिसांनी या महिलेकडून मोबाईलही जप्त केला आहे. गणेश कपूर या बनावट नावाने या महिलेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना शिवीगाळ केली होती. 7 सप्टेंबर रोजी अमृता यांच्या फेसबुक पोस्टखाली या महिलेने शिवीगाळ करणारी पोस्ट टाकली होती.

Amruta Fadnavis
Maharashtra: मुस्लिम तरुणीशी प्रेमविवाह, हिंदू तरुणाची हत्या, गोदावरीत फेकला मृतदेह

दुसरीकडे, या पोस्टमध्ये शिवीगाळ करण्यात आली होती. त्यामुळे ठाणे पोलिसांनी (Police) त्याचवेळी अज्ञात फेसबुक युजरविरोधात गुन्हा दाखल केला होता. अटक केल्यानंतर स्मृती पांचाळ ही महिला फेक अकाऊंट वापरुन शिवीगाळ असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे, तिने गणेश कपूर या नावाने फेक अकाऊंट तयार केलं होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com