केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील तस्करांविरोधात लावला कारवाईचा धडाका

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील तस्करांविरोधात कारवाईचा धडाका लावला असून आता मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने कुर्ला येथून ५० लाख ३० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले.

मुंबई: केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील तस्करांविरोधात कारवाईचा धडाका लावला असून आता मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने कुर्ला येथून ५० लाख ३० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी शबिना सर्फराज खान (वय २६) या सराईत महिलेला अटक करण्यात आली. वरळी कक्षाने ही कारवाई केली.

 कुर्ला (प.), एलबीएस रोड, फैजी- ए- दाऊदी बोहरा कब्रस्तानच्या गेटसमोर एक महिला अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची  खात्रीशीर माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटला मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी सापळा लावून शबिना हिला ५० लाख ३० हजार रुपये किमतीच्या ५०३ ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह अटक केली. कुर्ला (प.) येथे राहणारी शबिना ही मुंबई व उपनगरांत एमडी या अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी करीत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या