समाज माध्यमावर बनावट खाते उघडून महिलेची बदनामी

Dainik Gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

छायाचित्रासह अश्‍लील कमेंट; गुन्हा दाखल

मुंबई

इन्स्टाग्राम या समाज माध्यमावरील एका महिलेचे प्रोफाईल छायाचित्र दुसऱ्या बनावट खात्यावर वापरत त्यावर अश्‍लील भाषेत टिप्पणी करणाऱ्याविरोधात भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
परळ परिसरात राहणारी एक महिला इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. तिच्या इन्स्टाग्रामवरील एका मित्रानेच बनावट खाते उघडून तिचा फोटो त्यावर अपलोड करत त्यावर अश्‍लील भाषेत मजकूरही ठेवला आहे. हे खाते महिलेच्या एका नातेवाईकाच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत महिलेला कळवले. त्यानुसार या महिलेने तात्काळ भोईवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलेचा मित्रावर संशय
या महिलेने तिच्या एका मित्रावर संशय व्यक्त केला असून याबाबत इन्स्टाग्रामला ई-मेल करून संबंधित खात्याचा आयपी ऍड्रेसची मागणी करण्यात आली आहे. तो मिळाल्यानंतर आरोपीविरोधात कारवाई करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीने या महिलेच्याच प्रोफाईलवरील छायाचित्राचा वापर बनावट खाते तयार करण्यासाठी केला आहे. महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोपीने हा प्रकार केल्याचा संशय आहे.

संबंधित बातम्या