उपचारासाठी रुग्णालयात वेळेत न पोहचल्याने महिलेचा रस्त्यातच मृत्यू

रस्ता बंद असल्याने महिलेला खांद्यावर टाकून पायी जाण्याची वेळ आली. आणि या दरम्यान त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
Nandurbar Chandsaili Ghat
Nandurbar Chandsaili GhatDanik Gomantak

नंदुरबार : गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यात मुसळधार (maharashtra state) पाऊस सुरू आहे. काही भागात पूर परिस्थिती (Flood situation)निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी घाटात दरड कोसळण्याचे (Pain collapse)प्रकार सुरु आहेत. नंदुरबारमधल्या चांदसैली घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे तेथील रस्ते बंद झाले आहेत. या दरड कोसळीमध्ये सिदलीबाई पाडवी या महिला गंभीर जखमी झाली.

Nandurbar Chandsaili Ghat
Monsoon Updates: जाणून घ्या महाराष्ट्रात कुठे किती पाऊस

त्यानंतर, उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकल्यामुळे महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. सिदलीबाई पाडवी या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital)उपचारासाठी नेले जात होते. परंतु रस्ता बंद असल्याने सिदलीबाई पाडवी या महिलेला खांद्यावर टाकून पायी जाण्याची वेळ आली. आणि या दरम्यान त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com