मुंबईत पोलीस व्हॅन मध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

मुंबईमध्ये आज घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा पोलिसांची कर्तव्यदक्षता दिसून आली आहे. 

देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून, कोरोना रुग्णांचे आकडे रोज नवे विक्रम गाठताना पाहायला मिळता आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीतमुळे रोज अनेक नकारात्मक बातम्या आपल्या कानावर येता आहेत. या परीस्ठीमध्ये सुद्धा गेल्या वर्षभरापासून पोलीस, डॉक्टर आणि सर्वच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांच्या पराकाष्टा केल्या आहेत. त्यातच आज मुंबईमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा पोलीसांची कर्तव्यदक्षता दिसून आली आहे. 

Maharashtra Lockdown: लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध

मुंबईतील (Mumbai) वरळीनाका (worli Naka) परिसरातुन जात असणाऱ्या एका गरोदर महिलेला (Pregnant Woman) अचानक त्रास व्हायला सुरुवात झाली आणि ती महिला रस्त्यावर पडली. यावेळी आजूबाजूला उपस्थित नागरिकांनी लगेचच पोलीस (Police) नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस त्या ठिकाणी तातडीने दाखल झाले.  गरोदर महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ न घालवता पोलीस आपल्या व्हॅनमधूनच या महिलेला रुग्णालयाकडे घेऊन जात होते. यावेळी पोलीस व्हॅनमध्येच या महिलेने बाळाला जन्म दिला असल्याचे समजते आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर पोलीसांनी तातडीने या महिलेस रुग्णालयात भरती केले असल्याचे समजते आहे. पोलीसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेला योग्य वेळेवर मदत मिळाली. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून पोलीसांचे कौतुक होताना दिसते आहे. 

संबंधित बातम्या