Vaccination: लस घेण्याआधीच मिळाले वैक्सीन सर्टिफिकेट

Vaccination: लस घेण्याआधीच मिळाले वैक्सीन सर्टिफिकेट
co-win app

देशात कोरोनाचा संसर्ग (covid-19) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लसीकरण (Vaccination) करण्यावरही भर दिला जातो आहे. ऑनलाइन नोंदणी (Online registration) केल्यावरच लस घेता  येणार आहे. तसेच लस घेतल्यानंतरच सर्टिफिकेट (certificate) मिळणार आहे. परंतु उल्हासनगर येथील रहिवाशी कविता वाटवणी (56) यांना लस घेण्यापूर्वीच, लस घेतल्याचे सर्टिफिकेट  मिळाले आहे. (woman gets vaccine certificate before receiving the vaccine)    

कविता वाटवणी यांनी लगेच केंद्राकडे धाव घेतली.  त्यांना लस न मिळताच सर्टिफिकेटचा मॅसेज आला आहे. कोरोना लस त्यांना मिळाली पाहिजे. कर्मचाऱ्यांना घडलेली घटना सांगितली.

कविताचा मुलगा मोहित, जो फार्मास्युटिकल कंपनीत काम करतो, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. " माझ्या आईची शनिवारी सायंकाळी 5.55 वाजता नागरपालिकाद्वारे  चालवल्या जाणार्‍या शाळा क्र. 24, परंतु दुपारी 1 वाजता मला एक निरोप आला की तिची लसीकरण झाली आहे, ” मोहित म्हणाला. 
“संबंधित अधिकाऱ्यांनी  घडलेल्या घटनेचा शोध घ्यावा अशी मागणी मोहितने केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com