'भाजपमध्ये महिलांना सन्मान दिला जात नाही': मंदा म्हात्रे

भाजपमध्ये (BJP) महिलांचा सन्मान दिला जात नाही म्हणत भाजप आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
Manda Mhatre
Manda MhatreDainik Gomantak

भाजपमध्ये महिलांचा सन्मान दिला जात नाही म्हणत भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Welfare Minister Yashomati Thakur) यांच्यापुढे आमदार मंदा म्हात्रे यांनी आपली बोचरी खंत बोलून दाखविली आहे. दोन वेळा विधानसभेवर निवडूण आल्यानंतरही पक्षाकडून सतत डावललं जात असल्याचा गंभीर आरोप म्हात्रे यांनी केला होता. 2019 च्या निवडणूकीमध्ये आपण पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत आमदार मंदा म्हात्रे यांनी दिले होते. त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत स्वतःच्या केलेल्या सार्वजनिक कामावर निवडूण आल्याचा दावा देखील म्हात्रे यांनी केला आहे.

Manda Mhatre
कणकवलीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध किरीट सोमैया

दरम्यान, दोन वेळा विधानसभेवर निवडणून आल्यानंतर, स्वतःच्या कामातून कर्तृत्व सिध्द करुन दाखविल्यानंतर सुध्दा पक्षाकडून आपल्याला सातत्यानं डावलंल असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी बोलताना आपली खंत बोलून दाखविली. म्हात्र यावेळी म्हणाल्या, महिलांना सार्वजनिक कामामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी ज्यावेळी पहिल्यांदा निवडणून आले तेव्हा देशात मोदी लाट असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर मी दुसऱ्यावेळीही निवडणून आले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची लाट नाही ना? ते माझं काम होतं. परंतु “महिलांनी केलेले सार्वजनिक कामे झाकून टाकण्याचे काम स्वपक्षातील नेत्यांकडून करण्यात येते. त्यांच्या बातम्या लोकांसमोर येऊ द्यायच्या नाहीत, असे प्रकार अनेकदा होत आहेत.”

Manda Mhatre
ED समोर गैरहजर राहिल्यास अनिल देशमुखांना अटक होणार?

कोणाचाही भीती नाही!

शिवाय, आमदार मंदा म्हात्रे बोलताना पुढे म्हणाल्या की, कोणालाही घाबरत नाही. मला कोणाची भीती वाटत नाही. हे मी नेहमी स्पष्ट करते. मला आमदारकीचे तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्षही आसतात ना आपल्याला मदत करायला. राजकारणामध्ये महिलांना ज्यावेळी यश मिळू लागते तेव्हा स्वपक्षातील बडे नेते महिला नेत्यांचे पंख छाटण्यास सांगितले जाते. अशी नाराजी देखील मंदा म्हात्रे यावेळी बोलून दाखविली आहे. मात्र आपण कधीही स्वतःला कमी समजण्याचा प्रयत्न करु नये. असा सल्ला देखील यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com