महिला दिन मोठ्या उत्साहात होतोय; तर मग ‘पुरुष दिन’ का नाही?

जागतिक पुरुष दिन साजरा करून पुरुषांवर होणारा अन्याय, अत्याचार कश्या प्रकारे संपवता येईल, तसेच पत्नी कडून होणारा त्रास, त्यांच्या विविध केसेस, त्यानंतर पुरुषांनी त्या केसेस कशा लढायच्या याबाबत चर्चा झाली.
महिला दिन मोठ्या उत्साहात होतोय; तर मग ‘पुरुष दिन’ का नाही?
औरंगाबाद जागतिक पुरुष दिन साजराDainik Gomantak

औरंगाबाद: पत्नी पीडित आश्रमात जागतिक पुरुष दिन (World Men's Day) उत्साहात साजरा करण्यात आला. शीर्षासन आंदोलन करत पुरुषांनी हा दिवस आश्रमात साजरा केला. आंदोलन कर्त्यांनी या वेळी पुरुषांच्या हक्क संरक्षणासाठी विविध मागण्या केल्या आहेत. ज्या वेळी महिला दिन असतो त्यावेळी तो दिवस साजरा करताना अनेक पुरुषांचा सहभाग त्यामध्ये असतो. विविध शासकीय कार्यालयात महिला दिन (Women's Day) साजरा करण्यात येतो. परंतु कोणत्याही शासकीय कार्यालयात पुरुष दिन साजरा करीत नाहीत. यामुळे महिला आणि पुरुष हा भेदभाव आता तरी संपायला हवा. असे मत यावेळी उपस्थित पुरुषांनी व्यक्त केले आहे.

तसेच, देशाचे दर डोई उत्पन्न देखील घटले आहे. त्यामुळे पुरुष न्यायाच्या अपेक्षेने भटकतो. परंतु त्यांना केवळ, अन्याय,अत्याचार व विरह पडतो. त्यामुळे अखेर बहुतांश पुरुष हे हतबल होऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा मार्ग निवडतात. जर पुरुषांना वाचवायचे असेल तर पुरुषांना कायद्याचे संरक्षण देऊन समाजाची मानसिकता बदलायला हवी. असे पुरुष दिनानिमित्त पत्नी पीडित आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद जागतिक पुरुष दिन साजरा
मोदी सरकारला कळली 'शेतकऱ्यांची ताकद'

जागतिक पुरुष दिन साजरा करून पुरुषांवर होणारा अन्याय, अत्याचार कश्या प्रकारे संपवता येईल, तसेच पत्नी कडून होणारा त्रास, त्यांच्या विविध केसेस, त्यानंतर पुरुषांनी त्या केसेस कशा लढायच्या याबाबत चर्चा झाली. यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक ऍड. भारत फुलारे (Bharat fulare), चरणसिंग गुसिंगे (Charsingh gusinge), पांडुरंग गांडूळे (Pandurang gandule) आदींची मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com