महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परप्रांतीय कामगार जबाबदार : राज ठाकरे 

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. अशातच  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परप्रांतीय कारणीभूत आल्याचे वक्तव्य केले आहे.

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. अशातच  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परप्रांतीय कारणीभूत आल्याचे वक्तव्य केले आहे. मंगळवारी आयोजित एक पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांवर निशाणा साधला आहे. (Workers from other states are responsible for the second wave of corona in Maharashtra: Raj Thackeray)

महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे  इतर राज्यातून अनेक श्रमिक कामगार रोजगारासाठी महाराष्ट्रात येत असतात. या इतर राज्यातून आलेल्या कामगारांमुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. इतर राज्यात चाचण्यांची पुरेशी सुविधा नाही. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या वर्षी जे कामगार आपापल्या राज्यात परत गेले होते, त्यांनी तपासणी केली पाहिजे अशी मागणी मी केली होती, मात्र तसे करण्यात आले नाही,  असेही राज यांनी सांगितले.  

सीबीआय चौकशीला आव्हान देण्यासाठी अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारची सर्वोच्च...

दरम्यान, राज्यसरकारने लघु उद्योगांना उत्पादन करायला सांगितले आह, पण विक्रीला बंदी  घालण्यात आली आहे. मग जर उत्पादित माल विकायचा नसेल तर तर उत्पादन घेऊन ठेवायचं कुठे असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना आठवड्यातून दोन-तीन दिवस दुकान उघडण्याची परवानगी द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच, जीम आणि आणि खेळाडूंनादेखील योग्य शारीरिक अंतर राखात सरावाची परवानगी द्यावी अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. 

कोरोनाचा कहर: महाराष्ट्रात दिवसभरात 47,288 कोरोनाबाधित वाढले; 155 जणांचा मृत्यू

त्याचबरोबर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना परीक्षा न  घेता वरच्या वर्गात प्रमोट केलं तसच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यंनाही प्रमोट करन्याची मागणी केली आहे. हे विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून शाळेत गेले नाहीत, ते कोणत्या मानसिकतेत आहेत माहीत नाही, अभ्यास कसा झालाय माहिती नाही, मग परीक्षा काशी देणार, त्यामुळे लहान वर्गातील विद्यार्थ्याना जसे प्रमोट केले तसे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यंनाही प्रमोट करावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. 
 

संबंधित बातम्या