'हनी ट्रॅप' च्या जाळ्यात ओढत तरुण, तरुणींची फसवणूक
trap.jpg

'हनी ट्रॅप' च्या जाळ्यात ओढत तरुण, तरुणींची फसवणूक

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook) या सोशल मिडियावर (social media) बॅंक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाजमाध्यमांवर बदनाम करु, अशा पध्दतीने 'हनी ट्रॅप' (Honey Trap) चे प्रकार वाढले आहेत. चंद्रपूरमधील (Chandrapur) एका प्रतिष्ठीत कुटुंबातील तरुण मुलाला अशाच पध्दतीने एका तरुणीने त्याचे बनावट अश्लील छायाचित्र तयार करुन सोशल मिडियावर सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

शनिवारी सकाळी शहरातील एका प्रतिष्ठित कुटुबांतील मुलाला सोशल मिडियावर एका तरुणीने हॅलो, हाय असा संदेश पाठवला होता. मुलगी सुंदर दिसल्याने मुलगाही तिच्या जाळ्यात अडकला. त्यावर त्यानेही तिला उत्तर दिले. मुलाकडून प्रतिसाद  मिळाल्याचे पाहून मुलीने थेट त्याचा फोनद्वारे संपर्क साधाला. दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर काही क्षणातच मुलाच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर एका सुंदर मुलीसोबतचे अश्लील फोटो पाठवण्यात आले. (Youngsters cheating in Honey Trap)

त्यामध्ये एका मुलीसोबत या मुलाचेही फोटो संगणकावर (computer) तयार केलेले अर्धनग्न फोटो होते. सदर फोटो पाहून तो घाबरला, मात्र स्वत:ला सावरत त्याने घडला प्रकार आपल्या वडिलांना सागिंतला. त्यानंतर तात्काळ त्या मुलाच्या कुटुंबाने थेट शहर पोलिस (City Police)ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. शहर पोलिसांनी लगेच त्यांना सायबर क्राइम शाखा (Cyber Crime Branch) येथे पाठवले. तिथे सायबर पोलिसांनी फोन तपासून त्यातील सत्यता शोधून काढली. यामध्ये सायबर पोलिसांना या मुलाचे संगणकावर बनावट फोटो तयार केल्याचे दिसून आले. दरम्यान, या 'हनी ट्रॅप' च्या या घातक प्रकारामुळे तरुण तरुणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. तेव्हा पोलिसांकडून सोशल मिडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, स्वत:चे फेसबुक प्रोफाईल लॉक करुन ठेवावी, अनोळखी व्यक्तींना मॅसेंजरवर संवाद साधू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com