म्हापशात पालिका निवडणूक म.गो. पक्ष लढविणार: मोये

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

म्हापसा: म्हापसा पालिका मंडळात आमच्या म. गो. पक्षाचा सध्या एकही कार्यकर्ता नाही. त्यामुळे हा पक्ष आता म्हापशातील वीसही प्रभागात काम करणार आहे. आम्ही पक्षातर्फे पालिका निवडणूक लढवणार आहोत, असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता तथा पक्षाच्या केंद्रीय समितीचे माजी खजिनदार भाई मोये यांनी स्पष्ट केले आहे.

म्हापसा: म्हापसा पालिका मंडळात आमच्या म. गो. पक्षाचा सध्या एकही कार्यकर्ता नाही. त्यामुळे हा पक्ष आता म्हापशातील वीसही प्रभागात काम करणार आहे. आम्ही पक्षातर्फे पालिका निवडणूक लढवणार आहोत, असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता तथा पक्षाच्या केंद्रीय समितीचे माजी खजिनदार भाई मोये यांनी स्पष्ट केले आहे.

खोर्ली सीम येथे यासंदर्भात पक्षाच्या म्हापसा मतदारसंघ समितीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, आगामी पालिका निवडणुकीत म्हापसा पालिका काबीज करू असे आम्ही म्हणत नाही; पण, पालिकेत आमचे थोडे तरी प्रतिनिधित्व असावे, या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. आम्ही प्रभागनिहाय काम करून पालिका निवडणुकीसाठी म. गो. पक्षाचे उमेदवार ठरवणार आहोत. जिल्हा पंचायत निवडणूकही म.गो. पक्षातर्फे लढवली जाणार आहे. त्या निवडणुकीत आमचे उमेदवार निश्चि तपणे निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. कारण, त्या दृष्टीने पक्षाने व्यूहरचना केली आहे.

यावेळी पक्षाचे स्थानिक नेते मतदारसंघाचे युवा अध्यक्ष शुभम तोरस्कर, भारत तोरस्कर, श्रीपाद येंडे, एकनाथ म्हापसेकर, रामदास फळारे, विनायक दिवकर, रमेश मणेरकर इत्यादी उपस्थित होते.

श्री. मोये पुढे म्हणाले, म.गो. पक्षाकडून आम्हाला आदेश आला, की पालिका निवडणूक ऑक्टोाबरमध्ये होणार असल्याने उत्तर गोव्यात पक्षाच्या कामाची नव्याने सुरुवात म्हापशातून करा. मगो पक्षाचा म्हापसा हा बालेकिल्ला होता. पक्षाकडे आजही अनेक कार्यकर्ते आहेत. जुन्याजाणत्या तीन पस्तीस वर्षांपूर्वीच्या कार्यकर्त्यांची मुले आमच्या पक्षामागे आहेत असे आम्हाला जाणवले. म्हणूनच तर आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला अजूनही चांगले भवितव्य असल्याचे आम्हाला ठामपणे वाटते. पक्षाच्या काही नेत्यांवर आमचे कार्यकर्ते नाराज असले तरी त्या पुढाऱ्यांनीच आमचा मगो पक्ष अजूनही सांभाळून ठेवलाय हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे आम्ही पक्षाच्या तसेच त्या नेत्यांच्या पाठीमागे राहणार आहोत.

म्हादईसंदर्भातील प्रश्ना्वर बोलताना ते म्हणाले, अवघ्याच दिवसांनी यासंदर्भात पक्षाची एक समिती नियुक्तत करण्यात येईल. त्याअंतर्गत म्हापशातही एक वेगळी समिती असेल. त्या विषयासंदर्भात आम्ही संपूर्ण उत्तर गोव्यात जनजागृतीचे कार्य करणार आहोत. म्हादईसंदर्भातील प्रश्न् खरोखरच ज्वलंत आहे; पण, गोवा सरकार ज्या प्रमाणात पुढे येऊन ठोस कृती करायला हवी, तसे होताना दिसत नाही. त्याबाबतचे कारण कदाचित त्यांनाच माहीत असेल. म्हादईचा प्रश्नए आम्ही सोडवला नही तर गोव्याचे खरोखरच नुकसान होईल. राजेंद्र केरकर यांच्यासारख्या व्यक्तीक आज नि:स्वार्थीपणे त्या चळवळीत कार्यरत आहेत. त्यांच्यामागे आम्ही का उभे राहू नये, असा सवाल त्यांनी केला.

ढवळीकरबंधूंचे कार्य त्यांच्याच मतदारसंघांपुरती मर्यादित आहे असे आपणांस वाटत नाही का, असा सवाल पत्रकारांनी केला असता श्री. मोये यांनी सांगितले, त्याबाबत थोडेफार तथ्य असले तरी आता त्यांनी उत्तर गोव्यातही लक्ष दिले आहे. उत्तरेत ज्या ठिकाणी जाणे शक्यस नाही, त्या ठिकाणी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या दोन सदस्यांची नियुक्तीे करून त्यांना तिथे पाठवले जाईल, असे सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.

पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता एकनाथ म्हापसेकर म्हणाले, या पूर्वी म्हापसा विधानसभा निवडणूक पक्षातर्फे लढवण्यात आली होती तेव्हा सुदिन ढवळीकर यांनी प्रत्यक्ष येऊन प्रचारात सक्रिय भाग घेतला होता याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. त्यामुळे ढवळीकरबंधू अन्य मतदारसंघांकडे दुर्लक्ष करीत आहेत असे म्हणता येणार नाही. यापुढील निवडणुकांत मतदारयंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर केला तर म.गो. पक्षाचा विजय निश्चि त आहे, असा दावाही श्री. म्हापसेकर यांनी या वेळी केला.

सीएए कायद्यासंदर्भात पक्षाची भूमिका काय, असे विचारले असता श्री. मोये म्हणाले, पक्षाच्या केंद्रीय समितीने त्यासंदर्भात असून भूमिका जाहीर केलेली नाही. पक्ष जी भूमिका घेईल, ती आम्हाला मान्य असेल.

संबंधित बातम्या