गोव्याकडे येणारे म्हादईचे पाणी घटले

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

कर्नाटकने म्हादईचे ५० टक्के पाणी वळविले

आमदार ढवळीकर यांची सभागृहाला माहिती

पणजी: कर्नाटकने सुमारे ५० टक्के म्हादईचे पाणी वळविल्याचा आरोप मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आज विधानसभेत शून्य तासावेळी केला. उस्ते येथे म्हादईचे गोव्याकडे येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाली असल्याची माहिती आज सकाळी आपल्याला मिळाली. त्यामुळे येत्या मार्च महिन्यात उत्तर गोव्याला पाण्याचा दुष्काळ होऊ शकतो व हा धोक्याचा इशारा आहे, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्याबद्दल सरकार गंभीर आहे व त्याची दखल सरकारने घेतली आहे. कळसा - भंडुरा येथे तसेच गोव्याकडे येणाऱ्या म्हादईच्या जलप्रवाहाकडे लक्ष ठेवण्यात आले आहे. यावेळी जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी आमदार ढवळीकर यांना त्यांच्याकडे ठोस माहिती असल्यास ती द्यावी. खात्याच्या अधिकाऱ्यांना ती देऊन त्याची शहानिशा केली जाईल, असे सांगितले.  

संबंधित बातम्या