मांडो महोत्सवात रसिकांनी लुटला ‘मेंडोलिन’ वादनाचा आनंद

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

संस्कृती भवन पाटो येथे मांडो महोत्सवात वादन करताना ‘वारणा गर्ल्स’ चमू.

आकाशवाणी पणजी केंद्राचे माजी संचालक तथा नामवंत कवी माधव बोरकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बॉलीवुड संगीतातील नामवंत मेंडोलिन वादक प्रदीप्तो सेनगुपन्ता, मेंडोलिन प्रेमी क्लबचे संस्थापक अनिल पेंडसे, अभिजीत सामंत उपस्थित होते. २४ रोजी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी स्थापन केलेल्या संस्थेतील ‘वारणागटर्स’ समुहातील मुलींनी समुहवादन करून रसिकांची दाद घेतली.

पणजी : मेंडोलिन वाद्याचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने मेंडोलिन प्रेमी क्लब, पुणेतर्फे पाटो-पणजी येथील संस्कृती भवनच्या सहयोगाने चौथा ‘मांडो महोत्सव’ (मांडो फेस्टिव्हल ऑफ इंडिया) संस्कृती भान मधील सभागृहात २४ व २५ फेब्रुवारी रोजी मेंडोलिन वादनाच्या मैफलींनी रंगला. यात ५४ कलाकारांनी वादन करून मेंडोलिन वादनाचा आनंद दिला.

दुसऱ्या दिवशी २५ रोजी इटलीतील आघाडीचे मेंडोलिन वादक कार्लो ओंझो व लुरेंझो बर्नांडी यांनी आपल्या वादनाने रसिकांची उस्फूर्त दाद घेतली. या महोत्सवाचा समारोप, आर.डी. बर्मन यांच्याकडे वादक म्हणून काम केलेले कोलकाता येथील ख्यातनाम मेंडोलिन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता यांच्या एकल वादनाने व कार्लो ओंझो, लुरेंझो बर्नांडि व प्रदीप्तो यांच्या रंगतदार जुगलबंदीने झाला. एकलवादनात प्रदीप्तो यांनी यांनी मधुरधुनी वाजवून रसिकांना मनमुराद आनंद दिला.
कार्लो व लुरेंझो यांनी महोत्सवात कार्यशाळाही घेतली.

मेंडोलिनवादनात करिअर करायची संधी
मेंडोलिन हे पाश्‍चात्य वाद्य परंतु भारतात बॉलीवूड संगीतात त्यांचा समावेश केल्याने ते लोकप्रिय झाले. मात्र, आज हे वाद्य दुर्मिळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही ते जिवंत रहावे, त्याचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून मेंडोलिन प्रेमी क्लबची स्थापना केली आणि मग प्रदीप्तो यांच्या संकल्पनेतून ‘मांडो महोत्सव’ साकार झाला. राजकपूर यांच्या थिएटरमध्ये प्रथम महोत्सव केला. मेंडोलिन मध्ये करिअर करायची आज संधी आहे. कोल्हापूर-पुण्यात विद्यार्थी मेंडोलिन वाजवायला शिकत आहेत.

व्हॉटस्‌ॲपद्वारा आम्ही आमच्या क्लबचे १२० सदस्य केले आहेत. गोव्यातील आमच्या महोत्सवाला आसाम, नागपूर, ग्लाल्हेर, पुणे, मुंबई, सोलापूर, बेंगलोर, कोल्हापूर येथून मेंडोलिनवादक आले होते. मात्र, संपर्क साधून सुद्धा गोव्यातील वादक सहभागी झाले नाहीत. मेंडोलिन स्प्रूस या लाकडापासून बनवले जाते त्याची किंमत लाखो रुपये आहे, ते लाकूड भारतात मिळत नाही, अशी माहिती अनिल पेंडसे यांनी दिली.
 

संबंधित बातम्या