आंबा पिकाचे क्षेत्रफळ, उत्‍पन्‍न वाढविण्‍यात कृषी खात्‍याला यश

Dainik Gomantak
रविवार, 12 जानेवारी 2020

तेजश्री कुंभार, 
पणजी,

उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध असणारं राज्‍याती एक महत्त्‍वाचे फळ म्‍हणजे आंबा होय. मात्र २०१५-१६ यावर्षी आंब्‍याचे राज्‍यातील उत्‍पादन केवळ ५,९५८ टन इतके झाले होते. हि बाब निरीक्षणी येताच कृषी खात्‍याने कंबर कसली आणि २०१९ साली आब्‍यांचे ९,५४७ टन इतके आंब्‍याचे उत्‍पन्‍न वाढविण्‍यास त्‍यांना यश मिळाले. वातावरणाने साथ दिली तर यावर्षी १०, ००० टन उत्‍पदानाचा आकडा राज्‍यातील आंबा पार करणार असल्‍याचे कृषी खात्‍याचे म्‍हणणे आहे. 

२०१६-17 साली आंबालागवड ४९२० हेक्‍टर जमीनीत होते तर २०१९ साली ५००१ हेक्‍टर इतक्‍या जमीनीत आंब्‍याचे पीक घेण्‍यात आले. यावर्षी हा आकडा वाढावा म्‍हणून विभागीय कृषी अधीकारी अनेक प्रयत्‍न केले आहेत. शिवाय शेतकर्‍यांनी आंबा पीक लावावे म्‍हणून प्रती हेक्‍टर ४०, हजार रूपयांचा निधीही शेतकर्‍यांना देण्‍यात आला आहे. खडकाळ जमीनीमध्‍ये आंबा यावा म्‍हणून प्रती हेक्‍टर दोन लाख आणि जमीन खडकाळ नसेल तर एकरी १ लाख रूपयांचे अर्थसहाय्‍य शेतकर्‍यांना मिळते. 

वर्ष             आंबा उत्‍पादन (टनामध्‍ये)
२०१३ - १४      ८९४४
२०१४ - १५      ८८८७
२०१५ - १६      ५९५८
२०१६ - १७      ९५४५
२०१७ - १८       ९३९१
२०१८ - १९       ९५४७

साल           आंबा लागवडीखालील जमीन (हेक्‍टरमध्‍ये)
२०१६ - १७      ४९२०
२०१७ -१८      ४९६९
२०१८ -१९      ५००१

संबंधित बातम्या