स्थानिक मानकुराद आंबा मार्च अखेरीस बाजारात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजीः राज्‍याबाहेरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच सावंतवाडीतील आंब्‍याने पणजी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. गोव्‍याची ओळख असणारा मानकुराद आंबा मार्चच्‍या अखेरीस किंवा एप्रिलच्‍या पहिल्‍या आठवड्यात दाखल होईल, अशी माहिती गोवा कृषी खात्याने दिली. सध्‍या बाजारात उपलब्‍ध असणाऱ्‍या मानकुरादची किंमत ५००० रू. प्रति डझन अशी असून हा दर सर्वसामान्‍यांना परवडण्‍यासारखा नाही.

सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून आंबा राज्‍यात येत आहे. राज्‍यातील स्थानिक जातीचे प्रमाण अत्‍यंत अल्‍प आहे. लोणच्यासाठीही काही हिरवे आंबे बाजारात उपलब्‍ध असले तरी ग्राहकांचा आंबे खरेदीकडे मोठ्या प्रमाणात ओघ नसल्‍याची माहिती पणजी बाजारपेठेतील विक्रेत्‍याने दिली.

काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत गोवा अन्‍न आणि औषध खात्‍याने छापा टाकला होता. त्यावेळी येथे कृत्रिमरित्‍या पिकविल्‍या जाणाऱ्या फळांबाबतची सत्‍य माहिती हाती आली. त्‍यामुळे फळे विकत घेताना आम्‍ही सतर्कता बाळगतो. सध्‍या बाजारात असणारे आंबे आमच्‍यासारख्‍या सर्वसामान्‍य नागरिकांना परवडणारेही नाहीत. शिवाय त्‍यांच्‍याकडे पाहून लक्षात येते की त्‍यांना कृत्रिमरित्‍या पिकविले आहे. राज्‍यात आंबा येण्‍याचा कालावधी एप्रिल महिना असून त्‍यापूर्वी कृत्रिमरित्‍या पिकवलेले आंबे खाणे योग्‍य नसल्‍याने आम्‍ही आंबा खरेदी करीत नसल्‍याची माहिती अशोक पाटील या बाजारपेठेत आलेल्‍या ग्राहकांने दिली.

आंब्याच्या पिकाच्या फळधारणेला विलंब

राज्‍यात पावसाने उशीरा हजेरी लावल्‍याने झाडांची फळधारणा उशीरा झाली आणि त्‍याचा परिणाम म्‍हणजे फळे उशीरा खाण्‍यास पात्र होणार आहेत. सध्‍याचे वातावरणही आंबा पिकासाठी म्‍हणावे तितके फायदेशीर नाही. त्‍यामुळे आम्‍ही राज्‍यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांना भेटी देत पिकांच्‍या योग्‍य वाढीसाठी सल्‍ले देत आहोत. यावर्षी आम्‍हाला चांगले पीक यावे यासाठी आमचा प्रयत्‍न सुरू असल्‍याची माहिती कृषी खात्‍याचे संचालक नेविल अल्‍फोन्‍सो यांनी दिली.

आंब्याचे दर

आंबा प्रकार दर
मानकुराद ५००० रू. प्रति डझन
कलमी, प्‍यारी आणि कायरी आंबा २०० रू. प्रतिकिलो
बदामी ५०० रु. प्रति डझन
तोतापुरी १५० प्रति किलो

आंब्‍याचे वर्षागणिक उत्‍पादन
वर्ष उत्‍पन्‍न (टनामध्‍ये)
२०१६ -१७ ९५४५
२०१७ -१८ ९३७१
२०१८ -१९ ९५४७
 
संबंधित बातम्या