चौथा आरोपीला अटक  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

मंत्र्यांना खंडणीसाठी धमकावणारा
संशयित मनिष शहा गजाआड

पणजी: सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना वारंवार फोन करून खंडणीसाठी धमकावणारा फरारी असलेला संशयित मनिष शहा याला कांदिवली (मुंबई) येथून गोव्याच्या पणजी पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी संशयिताला न्यायालयाकडून पोलिस कोठडी घेतली आहे. संशयित मनिष शहा याने खंडणीवसुली प्रकरणाचा इन्कार केला आहे. त्याच्या मोबाईलचा कोणी तरी गैरवापर करून मंत्र्यांना या धमक्या दिल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयित मनिष शहा व मोबाईलवरून धमक्या दिलेल्या व्यक्तीचा आवाज जुळण्यासाठी ध्वनी चाचणी घेण्याची तयारी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर खंडणी नेण्यासाठी आलेल्या तिघाजणांना अटक केली होती. न्यायालयाने त्याना जामीन मंजूर केल्याने सुटका झाली होती.
 

संबंधित बातम्या