मारहाण प्रकरणी महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एकाला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एकाला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी आपल्याला चापट मारत शिवीगाळ केल्याची तक्रार कैलास सातपुते नावाच्या इसमाने पुण्याच्या यवत पोलिसांकडे केली आहे.

रात्री साडे आठ - नऊ च्या सुमारास मांजरेकर चौफुल्यातल्या न्यू अंबिका कला केंद्रात शूटींगसाठी जात होते. 'अंतीम' या चित्रपटाचे दिग्दर्शन मांजरेकर करत आहेत. हा 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ते पुणे सोलापूर महामार्गाने जात होते. य़ा दरम्यान यवतच्या वीज उपक्रेंद्रा जवळ त्यांच्या कारला सातपुते यांच्या कारची मागील बाजूने धडक बसली. त्यात मांजरेकरांच्या गाडीचे थोडेसे नुकसान झाले. यामुळे त्यांनी आपल्याला चापट मारत दमदाटी केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यवत पोलिसांनी महेश मांजरेकरांविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

संबंधित बातम्या