'तांडव' वर बहिष्कार टाकण्याचं राम कदमांनी केलं आवाहन 

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

प्रसिद्द अभिनेता  सैफ  अली  खान  याची  'तांडव'  वेबसीरीज  सध्या  वादाच्या  चक्रात अडकली  आहे. या  वेबसीरीजमध्ये  हिंदू  देवतांचा   अपमान  करण्यात  आला  असल्याचं  म्हटलं  जात  आहे. 

मुंबई: प्रसिद्द अभिनेता  सैफ  अली  खान  याची  'तांडव'  वेबसीरीज  सध्या  वादाच्या  चक्रात अडकली  आहे. या  वेबसीरीजमध्ये  हिंदू  देवतांचा   अपमान  करण्यात  आला  असल्याचं  म्हटलं  जात  आहे.  त्यामुळे  या  वेबसीरीजला  बॉयकॉट   करण्याची  मागणी  नेटकऱ्यांनी  लावून  धरली  आहे. 

याच  दरम्यान  भाजप  आमदार  राम  कदमांनी  या  वादात  उडी  घेतली  आहे.  त्यामुळे  आता  याला  राजकीय  गंध  येवू  लागला  आहे. तांडव  वेबसीरीजवर  बहिष्कार  टाकण्याची  मागणी  कदमांनी  केली  आहे. "हिंदू देवता  भगवान  शंकर. अभिनेता  जीशान  अय्यूब  याने  जाहीर  माफी  मागावी  आणि जोपर्यंत  या  वेबसीरीजमध्ये  आवश्यक  ते  बदल  होत  नाहीत  तोपर्यंत  बहिष्कार  टाका"  असं  ट्वी़ट  राम  कदमांनी  केलं  आहे.

तांडव  वेबसीरीझच्या  पहिल्या  एपिसोडमध्ये  भगवान  शंकर  आणि  श्रीरामाची  हेटाळणी  करण्यात  आली  असल्याचं  सांगण्यात  येत  आहे. दरम्यान  तांडव  ही  वेबसीरीज  अब्बास   जफर  आणि  हिमांशू  मेहरा  निर्मित  9  भागांची  वेबसीरीज  आहे. निर्माते  तांडव  वेबसीरीजमध्ये  बदल करतील  का?  हे  पाहणं  महत्त्वाचं  ठरणार  आहे.

संबंधित बातम्या