10 years of 2011 world Cup: क्रिकेट आणि सिनेमाने हा देश उध्वस्त केलाय...

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

'क्रिकेट आणि सिनेमाने हा देश उध्वस्त केला आहे ... लोक राजकारण्यांच्या इशाऱ्यावर चालतो ... शेतकऱ्यांसाठी काहीतरी सांगा, फरहान साहब ...' अशी कमेंट केली आहे.

नवी दिल्ली : 10 वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने आजच्या दिवशी भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला हा एक डोळे सुखावणारा विजय होता आणि या विजयात युवराज सिंग आणि एम.एस. धोनी आणि त्याचबरोबर संपूर्ण टिमचे महत्त्वपूर्ण योगदान होते. आज या पराक्रमाला 10 वर्ष पुर्ण झाले आहे. त्यांमुळे क्रिकेटप्रेमी आणि सेलिब्रिटी सोशल मिडियावर आपल्या आठवणी शेअर करत आहे. 

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने भारताच्या या विजयाची 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जुन्या आठवणी ला उजाळा दिला आहे. फरहान अख्तर, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि एम.एस. धोनीचा फोटो शेअर केला आहे. या  फोटोवर चाहत्यांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

''मैन ऑफ द मैच. मैन ऑफ द सीरीज. मैन ऑफ द टीम. क्या कमाल का दिन था यह!!! #10YearsOf2011WC, असं कॅप्शन हा फोटो शेअर करताना फरहान अख्तर दिलं आहे. धोनी हा मैन ऑफ द मैच, युवराज सिंग मैन ऑफ द सीरीज, सचिन तेंडुलकरसाठी टीम ऑफ मॅनचा अशा हॅलटॅगचा वापर केला आहे.

10 years of 2011 World Cup Winning : वर्ल्ड कपमधील विजयातील पडद्यामागचे 14 हिरो 

फरहान अख्तर च्या या ट्विटवर चाहत्यांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंमध्ये अनेक चाहते गौतम गंभीरला मीस करत आहेत, तर काहीजण फरहान अख्तरवर त्याच्या ‘डॉन’ चित्रपटाच्या तिसर्‍या भागाबद्दलही विचारपूस करत आहेत. त्याच वेळी एका चाहत्याने, 'क्रिकेट आणि सिनेमाने हा देश उध्वस्त केला आहे ... लोक राजकारण्यांच्या इशाऱ्यावर चालतो ... शेतकऱ्यांसाठी काहीतरी सांगा, फरहान साहब ...' अशी कमेंट केली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल 

संबंधित बातम्या