नॅशनल अवार्ड विनर अभिनेता Nedumudi Venu काळाच्या पडद्याआड

नेदुमुदी वेणू यांनी 1978 मध्ये दिग्दर्शक जी अरविंदनच्या थंबू चित्रपटातून मॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
नॅशनल अवार्ड विनर अभिनेता Nedumudi Venu काळाच्या पडद्याआड
Nedumudi Venufile Image

लोकप्रिय मल्याळम चित्रपट अभिनेता नेदुमुदी वेणू (Nedumudi Venu) यांचे निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि त्यांनी आज सोमवारी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच ते कोरोना संसर्गातून बरे झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नेदुमुडी वेणू यांची प्रकृती रविवारी बिघडली होती. त्यांना अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आणि शेवटी मृत्यूशी सुरू असलेला झूंज अपयशी ठरली आणि त्यांची आज सोमवारी प्राणज्योत मालवली. मल्याळम, तामिळ, तेलुगू चित्रपट जगताशी संबंधित लोकांनी त्यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे.

वेणू पत्रकारितेतून चित्रपटात आली

नेदुमुदी वेणू यांनी अभ्यासानंतर पत्रकारितेत आपलं नशिब आजमावला. त्यानंतर त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीकडे वाटचाल केली. नेदुमुदी वेणू यांनी 1978 मध्ये दिग्दर्शक जी अरविंदनच्या थंबू चित्रपटातून मॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सहा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले. वेणू यांनी 'चौराहे' नावाच्या इंग्रजी चित्रपटातही काम केले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com