30 मिलियन फॅन्ससाठी नोराने शेअर केले ग्लॅमरस फोटो

नोराने तिचे खास फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर (Instagram Account) शेअर केले आहे.
30 मिलियन फॅन्ससाठी नोराने शेअर केले ग्लॅमरस फोटो
Nora's pleasant shock to her fans by sharing glamorous photosInstagram/@norafatehi

नोरा फतेही (Nora Fatehi) बॉलीवूडची डान्सिंग क्वीन (Dancing Queen) बनली आहे. अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस (Glamorous) अंदाने सर्वांना सुखद धक्का दिला आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी नोरचे चाहते (Fans) नेहमीच उत्सुक असतात. हेच कारण आहे की ती सुद्धा सोशल मिडियाद्वारे (Social media) तिच्या चाहत्यांना भेटण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. अलीकडेच नोराने तिचा खास दिवस चाहत्यामध्ये साजरा केला आहे.

नुकतेच तिच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटाचे 'जलिमा कोका कोला' ही गाणे रसिकांच्या समोर सादर केले आहे. ही गाणे सोशल मिडियावर (Social Media) खूप धुमाकूळ घालत आहे. तसेच पुन्हा एकदा तिच्या डान्सचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, नोराने तिचे खास फोटो तिच्या अधिकृत इस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहे.

* नोराचे 30 दशलक्ष फॉलोअर्स

अलीकडेच नोराने इन्स्टाग्रामवर तिचे 30 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. नोरा आणि तिच्या चाहत्यांसाठी हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे. अशा वेळी नोरा फतेहीने तिच्या चाहत्यांचे आभार मानून दोन अतिशय ग्लॅमरस फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Nora's pleasant shock to her fans by sharing glamorous photos
जुही चावलाने 5G प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयातून याचिका घेतली मागे

या फोटोमध्ये ती खूप हॉट दिसत आहे. फोटोमध्ये नोरा टायगर प्रिंट कलर कोल्ड क्रॉप टॉप तसेच हाय थाई स्लिट स्कर्टमध्ये दिसत आहे. नोरची स्टाइल कौतुकास्पद आहे. एवढेच नाही तर नोरा हिने ही पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, 30 मिलियन पूर्ण झाले आहे, तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. नोराची ही पोस्ट सोशल मिडियावर लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांनी पोस्टवर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Nora's pleasant shock to her fans by sharing glamorous photos
Shantit Kranti Trailer: गोवा रोड ट्रिपची धमाकेदार कहाणी

* या प्रकल्पामध्ये नोरा चमकणार आहे

नोरा फतेहीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नोरच्या करियरची सुरुवात सलमान खानचा शो बिगबॉसपासून झाली होती. या शो नंतर नोराला अनेक गाण्यावर डान्स करताना पहिले गेले. पण नोराला दिलबर या गाण्यातून खरी ओळख मिळाली. नोरा अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात दिसणार आहे. भुज 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com