अमिताभ-जया बच्चनच्या लग्नाची 49 वर्षे पूर्ण, फेमस कपलच्या प्रेमाची अनोखी कहाणी

आज दोघेही त्यांच्या लग्नाचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
 Amitabh - Jaya Bachchan Anniversary
Amitabh - Jaya Bachchan AnniversaryDainik Gomantak

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे नाव इंडस्ट्रीतील सर्वात पॉवर कपलपैकी एक आहे. आज दोघेही त्यांच्या लग्नाचा 49 वा वाढदिवस जल्लोशात साजरा करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांनाच माहिती असेल. (49 years of Amitabh Bachchan Jaya Bachchan marriage a unique love story of a famous couple)

 Amitabh - Jaya Bachchan Anniversary
IIFA 2022 शो च्या वेळी सलमान खान रितेशवर झाला नाराज

अभिनेत्याचे वडील हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांच्या एका अटीमुळे जया बच्चन आणि बीग बी यांचे लग्न झाले होते. खरे तर बीग बी आणि जया 'जंजीर' चित्रपटात प्रमुख भुमिकेत काम करत होते. एके दिवशी त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की जर 'जंजीर' चित्रपट हिट झाला तर आपण सगळे लंडनला पार्टी करायला जावूयात.

वेळ निघून गेला, चित्रपट हिट झाला, अमिताभ आणि जया यांनीही लंडनला जाण्याची तयारी सुरू केली. बीग बींनी जया बच्चन सोबत लंडनला जाण्याबाबत वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले की, जर त्यांना (अमिताभ) लंडनला जायचे असेल तर त्यांनी जयासोबत लग्न करूनच लंडनला जावे.

 Amitabh - Jaya Bachchan Anniversary
कोण आहे कमली? जिला मिळाला पाकिस्तानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा टॅग, झाली ऑस्करची मागणी

यानंतर अमिताभ बच्चन यांनी जयाला लग्नासाठी प्रपोज केले आणि अभिनेत्रीने लगेच होकार देखील दिला. जया बच्चने यांनी हो म्हटल्यानंतर त्यांच्या घरच्यांशी बोलणे झाले आणि तिथून होकार देताच बीग बी आणि जया यांचे लग्न निश्चित झाले.

2 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न झाले, त्यानंतर दोघेही लंडनला पार्टीसाठी गेले. जया बच्चन आणि बीग बी यांनी 'शोले', 'मिली', 'गुड्डी' आणि 'सिलसिला' सारख्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र प्रमुख भुमिकेमध्ये काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com