मंद आनंद, उल्हासाच्या लाटेवर स्वार होत 51 व्या इफ्फीला प्रारंभ (फोटो)

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

नेमेची येतो मग पावसाळा, या कवितेतील ओळीसारखा गेली सोळा वर्षे वेळेवर नोव्हेंबर महिन्यात गोव्यात येणारा इफ्फी यंदा पावणे दोन महिने उशिरा आला आहे. पण येताना नेहमीप्रमाणे आनंद, उल्हासाची मंद का होईना लाट सोबत घेऊनच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली आहे.

पणजी : नेमेची येतो मग पावसाळा, या कवितेतील ओळीसारखा गेली सोळा वर्षे वेळेवर नोव्हेंबर महिन्यात गोव्यात येणारा इफ्फी यंदा पावणे दोन महिने उशिरा आला आहे. पण येताना नेहमीप्रमाणे आनंद, उल्हासाची मंद का होईना लाट सोबत घेऊनच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली आहे. पणजी येथे आज भारताच्या 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळेस केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. तर यंदाच्या इफ्फी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास अभिनेता सुदीप यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.    

यंदाच्या इफ्फी महोत्सवास कोरोनाच्या खबरदारीमुळे प्रतिनिधींची संख्या सुमारे चार पाच हजारांनी रोडावलेली होती. मात्र तरीसुद्धा द शो मस्ट गो मस्ट गो ऑन असे म्हणत आयोजकांनी इफ्फीची सुरवात केल्याचे पाहायला मिळाले. रसिकप्रेमी प्रतिनिधीच नव्हेत तर माध्यम प्रतिनिधी, अधिकारीवर्गाच्या संख्येवर देखील निर्बंध आलेले आहेत. आणि त्यामुळे ठिकठिकाणी हेल्प डेस्क्स, स्वयंसेवकांचे घोळकेही नाहीत, अजून खान पानासाठी शामियाने उभारलेले नाहीत. पण छोटी दालने आयनाॅक्स प्रकारात स्थानापन झालेली आहेत.  

इफ्फीचे आयोजन उशीरा झाले तरी प्रतिनिधी शुल्क आकारणीत कपात करण्यात आलेली नाही. एक हजार रुपयांहून अधिक पैसे मोजूनही कॅटलाॅग्ज असलेल्या बॅग्ज, प्रतिनिधींच्या हाती ओळखपत्र घेताना मिळाल्या नसल्याने असे का? बॅग्ज का नाहीत? असे प्रश्न ओळखपत्रांचे वितरण करणाऱ्या स्वयंसेवकांना विचारले जात आहेत. या प्रश्नांवर माहित नाही हे उत्तर ऐकावे लागत असले तरीही संयम सुटलेला नसल्याचे यावेळेस दिसते. व कदाचित  कोरोनामुळे प्रत्येकाकडे सहनशिलता आली असावी. 

इफ्फी डेलीचे रूपांतर पिकाॅक मध्ये -  
इफ्फी आला की दहा दिवस इफ्फीविषयक वृत्त देणारे नियतकालिकही येते. काही वर्षांपूर्वी सिनेसृष्टीशी जोडलेल्या पत्रकारांच्या सहकार्याने ते काढले जायचे.  पण आता या नियतकालिकाचे व्यावसायिकरण झाले आहे. यंदा तर ते ऑनलाईन झाले आहे. पूर्वी ते इफ्फी डेली असेच नियतकालिकाला संबोधले जात होते.  परंतु आता त्याचे नामकरण पिकाॅक असे झाले आहे. इफ्फीचे बोधचिन्ह हे मोर आहे. व हा मोर विविध रंगांत, ढंगांत या नियतकालिकाचे मुखपृष्ठ सजवतो. याशिवाय या नियतकालिकेचे अंतर्गत लेखनही शिस्तीत, युवकांना साथीला घेऊन करण्यात येते. 
 
रोषणाईचे नवे रुप - 
इफ्फी म्हणजे रोषणाई आलीच. गेल्यावर्षी 50 व्या इफ्फीत तर संपूर्ण पणजी लखलखली होती. यंदा लुकलुकत्या दिव्यांच्या कमानी आयनाॅक्स ते कांपाल परिसरात आहेत. रोषणाईचे एक नवे रुप या कमानीतून साकारले आहे. झाडांखाली फोकस दिवे लावून झाडेही रंगीबेरगी प्रकाशझोतात आणली जात आहेत.

Image may contain: 6 people, people dancing and people on stage, text that says "5 onal"

Image may contain: 1 person, dancing and on stage

Image may contain: 1 person, on stage and standing

Image may contain: 3 people, people standing, people dancing and people on stage

Image may contain: 1 person, playing a musical instrument and on stage

Image may contain: one or more people, people dancing, people playing musical instruments, people on stage, people standing and indoor

Image may contain: 1 person, standing and on stage

Image may contain: one or more people, people dancing, people on stage and indoor

Image may contain: 1 person, standing, dancing and on stage

Image may contain: 3 people, people standing and people on stage

संबंधित बातम्या