66 वा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर तापसी पन्नूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 

66 वा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर तापसी पन्नूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 
इरफान खान.jpg

66 वा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसल्याचे आपण पाहिले. चित्रपट सृष्टीसाठी देखील हा काळ तितकाच कठीण होता. लॉकडाऊनमुळे सिनेमा बंद झाल्यामुळे कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला नाही. मात्र अनलॉक काळात हळूहळू चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. तथापि, फिल्मफेअरने मागील वर्षाच्या सुरूवातीस प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी 66 वा फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा केली आहे. (66th Filmfare Awards announced; Irrfan Khan won Best Actor and Tapsi Pannu won Best Actress)

66 व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan)  यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 'इंग्लिश मीडियम' चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. इरफान खानचे नाव पुढे आल्यावर त्याच्या चाहत्यांना अभिमान वाटला पण तितकेच दु:खही झाले. तर महानायक अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) पुरस्कार मिळाला. तर 'जवानी जानेमन' चित्रपटासाठी अभिनेत्री अलाया फर्निचरवाला'ला सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

तर 'थप्पड' चित्रपटासाठी अभिनेत्री तापसी पन्नूला (Tapsi Pannu)  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर 'सर' चित्रपटासाठी अभिनेत्री तिलोत्मा शोम'लाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे दोन्ही चित्रपट हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले आहेत. याखेरीज सैफ अली खानलादेखील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या भूमिकेसाठी (मेल) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.


सर्वोत्कृष्ट चित्रपट : थप्पड

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 
ओम राऊत (तन्हाजी: द अनसंग योद्धा)
सर्वोत्कृष्ट चित्रपट(क्रिटिक्स)
प्रेतिक वत्स (अब इलिया ओओ!)

सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रमुख भूमिका (पुरुष)
इरफान खान  (इंग्लिश मीडियम)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)
अमिताभ बच्चन  (गुलाबो सीताबो)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रमुख भूमिका (महिला)
तापसी पन्नू (थप्पड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)
तितोल्मा शोम - (सर)

सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष)
सैफ अली खान (तन्हाजी: अनसंग वॉरियर)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (महिला)
फारूक जाफर (गुलाबो सीताबो)

उत्तम कथा
अनुभव सुशीला सिन्हा आणि मृण्मयी इंप्लिमेन्ट वैकुल (थप्पड)

सर्वोत्कृष्ट पटकथा
रोहेना गेरा (सर)

उत्तम संवाद
जुही चतुर्वेदी (गुलाबो सीताबो)

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक
राजेश कृष्णन (लूटकेस)

सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला
आलाया फर्निचरवाला (जवानी जाने)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम
प्रीतम (लुडो)

सर्वोत्कृष्ट गीत
गुलजार (छपक-छपक)

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक (मेल)
राघव चैतन्य (उदबत्तीचा तुकडा)

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक (महिला)
असीस कौर- (मलंग-मलंग)

जीवनगौरव पुरस्कार
इरफान खान

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com