67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; कंगना रानौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 
National Films Awards

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; कंगना रानौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे लांबणीवर पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सोमवारी घोषणा झाली. राष्ट्रीय चित्रपट महोत्सव साधारणपणे 3 मे रोजी आयोजित केला जातो, मात्र कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा जवळपास एक वर्ष उशीरा घोषित झाला. दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. फीचर फिल्म प्रकारात 461 आणि नॉन-फिचर फिल्म प्रकारात 220 चित्रपटांचा यात समावेश करण्यात आला आहे. (The 67th National Film Awards were announced today)

यात दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या छिछोरे चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता वरुण शर्मा, ताहिर राज भसीन यांच्यासह सुशांत सोबत मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर अभिनेता मनोज वाजपेयी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता धनुष यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. मनोज वाजपेयीला हा पुरस्कार 'भोसले' आणि धनुषला 'फॉर असुरान' साठी  हा पुरस्कार देण्यात आला आहे. मनोज वाजपेयींचा हा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. यापूर्वी, त्यांना 'सत्या' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला होता. तर 'पिंजर' चित्रपटातील अभिनयासाठी मनोज बाजपेयी यांना विशेष ज्युरी पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले होते.

त्याचबरोबर, मणिकर्णिका - द क्वीन ऑफ़ झांसी आणि पंगा या चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना रनौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगनाचा हा चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. तिला यापूर्वी 'फॅशन' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि यानंतर क्वीन व तनु वेड्स मनु रिटर्न्ससाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय सेतुपति (सुपर डिलक्स - तामिळ)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (ताशकंद फाईल्स - हिंदी)

सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्व गायक - बी प्राक (तेरी मिट्टी - केसरी)

सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायक- सवानी रवींद्र (मराठी चित्रपट- बारडो)

सर्वोत्कृष्ट चित्रपट समालोचक - सोहिनी चट्टोपाध्याय

दिग्दर्शक - हेलेन (मल्याळम), दिग्दर्शक -मुथुकुट्टी झेव्हियर यांच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या चित्रपटाचा इंदिरा गांधी पुरस्कार.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com