कोण आहे प्रसिद्ध संगीतकार A R Rahman यांचा जवाई

A R Rahman ने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत खतिजाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोण आहे प्रसिद्ध संगीतकार  A R Rahman यांचा जवाई
A R RahmanInstagram

प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) यांची मुलगी खतिजा रहमान (Khatija Rahman) लग्ण बंधणात (Wedding) अडकली आहे. खुद्द एआर रहमानने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना त्याने सांगितले की, त्याच्या मुलीचे लग्न तिच्या मंगेतर रियासदीन रियानसोबत (Riyasdeen Shaik Mohamed) झाले आहे. फोटोमध्ये, नववधू खतिजा आणि तिचा नवरा सोफ्यावर एकत्र बसलेले दिसत आहेत. त्याचवेळी एआर रहमान आपल्या मुलीच्या मागे उभा आहे. रहमान यांचा जावई व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत रहमानने लिहिले, 'देव या नवीन जोडप्याला आशीर्वाद देवो, सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.' ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यावर दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच लोक कमेंट करून नवीन जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. (A R Rahman latest Photo)

* सेलिब्रिटीकडून शुभेच्छाचा वर्षाव

या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटीनी देखील कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने प्रतिक्रिया दिली, 'खतिजा आणि रियासदीन रियानचे हार्दिक अभिनंदन. देव या सुंदर जोडप्याला आशीर्वाद देवो.' यासोबतच लोक या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छाही देत ​​आहेत.

खतिजा रहमानने 29 डिसेंबरला रियासदीन शेख मोहम्मदसोबत साखरपुडा केला होता. त्या दिवशी तिचा वाढदिवसही होता. त्यानंतर खतिजाने तिच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. खतिजाने लिहिलं होतं की, 'सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने, रियासदीन शेख मोहम्मदसोबत माझा साखरपुडा झाला हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. तो एक उद्योजक आणि ऑडिओ इंजिनिअर आहे. माझ्या वाढदिवशी 29 डिसेंबरला जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. फारच कमी लोकांना माहिती असेल की, एआर रहमान यांची मुलगी खतिजाने तामिळ चित्रपटांसाठी (Movie) काही गाणी गायली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.