'लाल सिंग चड्ढा’ नंतर 'या' चित्रपटात झळकणार आमिर खान

लवकरच आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटानंतर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
Aamir Khan
Aamir KhanDainik Gomantak

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खान ओळखला जातो. सध्या आमिर त्याच्या आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण, हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधीच आता आमिर खानच्या पुढील चित्रपटाची बातमी समोर आली आहे. विविध प्रकारच्या भूमिका साकारल्यानंतर आमिर आता एका स्पोर्ट्स ड्रामामध्ये झळकणारआहे.

मिळालेल्या माहितीनुसार आमिर खान 'शुभ मंगल सावधान'चे दिग्दर्शक आर.एस प्रसन्ना दिग्दर्शित होणाऱ्या स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसणार आहे. आमिरचा (Aamir Khan) हा आगामी चित्रपट असेल. आमिरने या चित्रपटासाठी प्राथमिक तयारी सुरू केली असून याचे शूटिंग ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आमिर स्पोर्ट्स ड्रामाची तयारी सुरू करणार आहे. आमिर खानला अनेक दिवसांपासून तरुण चित्रपट निर्मात्यांबरोबर काम करण्याची इच्छा होती. प्रसन्ना यांच्याशी आमिर बऱ्याच दिवसांपासून संपर्कात होता. अद्वैत चंदनने 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. अद्वैतने याआधी आमिर खान आणि झायरा वसीम यांच्या 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाचे (Movie) दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटाची निर्मिती आमिर आणि किरण राव यांनी केली होती.

Aamir Khan
Happy Birthday Arijit Singh: 'किंग ऑफ प्लेबैक सिंगर'

* हा चित्रपट कधी रिलीज होणार ?

आमिर खानचा स्पोर्ट्स ड्रामा 2023 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, असे म्हटले आहे की या चित्रपटाचे निर्माते पुढील वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतेही घोषणा झालेली नाही. आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढाच्या' अनेक रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com