'आमिर खान'चा ‘सरफरोश 2’ येतोय !
Aamir Khan starrer Sarfarosh 2 will be dedicated to the Indian CRPF personnel

'आमिर खान'चा ‘सरफरोश 2’ येतोय !

पणजी : 1999 साली गाजलेल्या, राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचलेल्या ‘सरफरोश’ या सिनेमाचा दुसरा भाग ‘सरफरोश-2’ या सिनेमासाठी काम सुरू झाले आहे. अभिनेते आमीर खान हे ‘सरफरोश 2’ ची निर्मिती करतील. त्यासाठी त्यांनी लेखक, दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मथान यांच्याशी संपर्क साधला आहे.

श्री. मथान हे इफ्फीतील इंडियन पॅनोरमा ज्युरी मंडळाचे सदस्य आहेत. ‘सरफरोश’ हा त्यांचा वीस वर्षांपूर्वीचा गाजलेला सिनेमा. दीर्घ पल्ल्यानंतर ते आता ‘सरफरोश २’ करणार असून त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्याशी आज आभासी माध्यमातून पत्र सूचना कार्यालयाने संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘सरफरोश २’ चे लेखनचे कथानक तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाचव्यांदा लेखन केल्यानंतर अखेर कथानकावर शिक्कामोर्तब झाले असून माझे विचारचक्र मल्ल्याळम भाषेतून धावते, हिंदी रोमन लिपीतून मी लेखन करतो, असेही त्यांनी सांगितले. 

सीआरपीएफ जवानांना ‘सरफरोश 2’ समर्पित केला जाणार असून या चित्रपटात गाणी कमी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दोनशेहून अधिक सिनेमा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती केलेल्या श्री. मथान यांनी ‘सरफरोश’ या चित्रपटाच्या आठवणीना उजाळा दिला. या चित्रपटात आमीर खान यांची प्रमुख भूमिका होती. दोन प्रेमगीते  त्यांत होती, सिनेमाचे कथानक प्रेमकहाणीचे असल्यामुळे ती कथानकाला साजेशी होती.

मला दोन गाण्यांचा समावेश सिनेमात नको होता परंतु त्या काळात सिनेमातील गाण्याला खूप महत्त्व होते, सिनेमाचे अर्थकारणही गाण्याभोवती फिरायचे अशी आठवण त्यांनी कथन केली. भारत पाकिस्तान परिस्थितीसंबंधांवर सिनेमा गुंफला गेला होता. आज चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी गाणे महत्त्वाचे नसल्यामुळे ‘सरफरोश 2’ मध्ये गाणी कमी असतील असे ते म्हणाले. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com