आमिरच्या शोमध्ये आयपीएस अधिकाऱ्याने मुंबईतील वसुली यंत्रणेबद्द्ल दिली होती कबुली

आमिरच्या शोमध्ये आयपीएस अधिकाऱ्याने मुंबईतील वसुली यंत्रणेबद्द्ल दिली होती कबुली
In Aamir show an IPS officer confessed about the Mumbai recovery system

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या स्फोटक पत्रामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात असे लिहले आहे की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार आणि हॉटेलमधून 50 ते 60 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. या प्रकारे दरमहा एकूण 100 कोटी रुपये जमा करावेत असा आदेश दिला होता.

सोमवारी, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (In Aamir show an IPS officer confessed about the Mumbai recovery system)

महाराष्ट्रात हे राजकिय वसुली नाट्य सुरु असतानाच बॉलिवूड प्रसिध्द अभिनेता आमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची एक क्लिप सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ त्या भागाचा आहे ज्या मध्ये आयपीएस संजय पांडे बोलताना दिसत आहेत. पोलिस घेत असलेल्या लाच याविषयी ते बोलत आहेत. ते या व्हिडिओमध्ये बोलत आहेत की, लाच पोलिस सिस्टिमध्ये कशाप्रकारे वितरीत केली जाते.

या व्हिडिओमध्ये अभिनेता आमीर खान म्हणतो, ‘’पोलिस अधिकारी, हवालदार, हे सर्वसामान्य माणूस, ऑटोरिक्षा चालक यांच्यांकडून लाच  घेताना बऱ्याच वेळा आपण पाहतो. आपण सहज म्हणतो की त्यांचा पगार कमी आहे, परंतु आमच्यासारख्या माणसांकडून जमा केलेली रक्कम फारच मोठी असते याचा अर्थ त्याची कमाई चांगलीच होत असावी.’’  

यावर आयपीएस अधिकारी संजय पांडे उत्तर देतात की, ‘’जर हे लोकांकडून वसूल केलेले पैसे कुणा एका व्यक्तीकडे राहिले असतील तर मी या गोष्टीवर सहमत आहे. त्य़ाने गोळा केलेली रक्कम तो घरी घेऊन जात असेल यावर माझा विश्वास नाही.’’

त्यानंतर आमिर अधिकाऱ्याला विचारले की, वसूल करण्यात आलेल्या पैशांचे काय होते, ते कुठे जातात? यावर आयपीएस पांडे म्हणतात, आपण सर्वजण लोकशाहीमध्य़े राहत आहोत. आपणा सर्वांना माहित आहे की, वरिष्ठांची क्रमवारी असते. आणि त्यावर आपण निवडूण दिलेले राजकिय प्रतिनिधी येतात. ही एक साखळी आहे.

यावर आयपीएस पांडे समजावणीच्या स्वरात उत्तर देतात, ‘’सामान्य माणसांच्या मते भ्रष्टाचाराचे दोन प्रकार असतात. त्यामधील एक संघटीत प्रकार. रस्त्यावर तुमच्याकडे परवाना मागितला जातो तो नसल्यास काही प्रमाणात तडजोड केली जाते. हा थोडासा असंघटीत प्रकार. पोलिसांना माहीत नाही की त्यांच्याकडून किती रक्कम मिळेल, परंतु या गोष्टी वेळोवेळी बदलत जातात. संघटीत प्रकारात- रेस्टारंट्स दारुची दुकाने बार येतात.’’ 

आमिर मध्येच विचारतो. म्हणजे काही ठराविक रक्कम अपेक्षित असतेच काय’’, त्यावर पांडे म्हणतात, ‘’ही ती रक्कम आपेक्षित असतेच.’’
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com