'Kabhi Eid Kabhi Diwali' मधून आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल बाहेर, 'हे' दोन कलाकार दिसणार सलमान खानसोबत

'कभी ईद कभी दिवाळी' ची घोषणा झाल्यापासून त्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या सोशल मिडियावर येत आहेत.
Kabhi Eid Kabhi Diwali |Salman Khan
Kabhi Eid Kabhi Diwali |Salman Khan Dainik Gomantak

सलमान खानसोबत 'अंतिम' चित्रपटामध्ये दिसलेला अभिनेता आयुष शर्माही 'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये अॅक्शन करताना दिसणार होता. बॉलिवूडच्या 'भाईजान'सोबत तो दुसऱ्यांदा स्क्रिन शेअर करणार होता. पण आता आयुषने आपली पावले मागे घेतल्याची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने (Salman Khan) 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. या चित्रपटाचे शूटिंग सुरू होत असल्याचे सांगितले होते. त्याआधी अभिनेत्री पूजा हेगडे हिनेही सोशल मीडियावर वेगळ्या स्टाईलमध्ये फोटो पोस्ट करत शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली होती. शहनाज गिलही या चित्रपटाच्या सेटवर दिसली होती. पण अलीकडेच आयुषने चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. याशिवाय झहीर इक्बाल देखील या चित्रपटामधून बाहेर पडण्याच्या बातम्याही समोर येत आहेत. (Kabhi Eid Kabhi Diwali Salman Khan Latest News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानची बहीण अर्पिता सिंगचा पती आयुष शर्माने या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण तो क्रिएटिव्हजच्या अडचणीत सापडला आहे. प्रोडक्शन हाऊसच्या जवळच्या एका सूत्राने असे सांगितले की, 'कभी ईद कभी दिवाळी' (Kabhi Eid Kabhi Diwali) च्या टीमने आधीच काम आणि चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते, परंतु आयुष आणि SKF (सलमान खान फिल्म्स) यांच्यात काही गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे.

Kabhi Eid Kabhi Diwali |Salman Khan
दीपिका पदुकोणच्या नेकनेलसची रंगलीये चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क

* आयुष-झहीर 'कभी ईद कभी दिवाळी' मधून बाहेर

या कारणामुळे आयुषने प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, आयुषने चित्रपटाच्या त्याच्या भागाचे शूटिंग सुरू केले होते आणि संपूर्ण दिवसाचे शूट देखील पूर्ण केले होते. आयुषच्या बाहेर पडल्यामुळे, 30 डिसेंबरला रिलीज होणारा हा चित्रपट आता कढी रिलीज होणार यांची चिंता वाढली आहे. असेही वृत्त आहे की आयुष शर्माच्या बाहेर पडल्यानंतर आता अफवा देखील पसरत आहेत की झहीर इक्बाल, जो चित्रपटाचा भाग होता, त्याने देखील चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही जेव्हा झहीरला या चित्रपटामध्ये सहभागी होण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने यावर मौन बाळगले होते.

* 'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये हे कलाकार दिसणार

आता निर्मात्यांनी आयुष आणि झहीरच्या जागी भाग्यश्रीचा मुलगा आणि अभिनेता अभिमन्यू दासानी आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान यांना वेगवेगळ्या भूमिकांसाठी संपर्क साधला जात आहे. अचानक झालेल्या या बदलांमुळे चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम होणार आहे. तसेच, त्याची रिलीज डेटही पुढे ढकलली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com