अभिषेक बच्चन साकारणार दहावी नापास मुख्यमंत्र्याची भूमिका

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

 अभिषेक बच्चन याचा 'लुडो' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो बटुकेश्वर तिवारीच्या भूमिकेत दिसला होता.

नवी दिल्ली: अभिषेक बच्चन याचा 'लुडो' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो बटुकेश्वर तिवारीच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्यानी 'ब्रेथ' या वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे, ज्यामधील त्याच्या भूमिकेला चांगली पसंती मिळाली. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची कारकीर्द नक्कीच ठप्प पडेल असे अनेकांने वाटले होते, पण तसे झाले नाही. त्याच्या चित्रपट कारकिर्दीला पुन्हा वेग आला आहे. त्याला अनेक उत्तम चित्रपट मिळत आहेत. त्याची कामगिरी देखील चांगली होत आहे. त्याच्या 'लुडो'ने कोरोना साथीदरम्यान प्रदर्शित होऊनही चांगली कामगिरी केली होती. एकंदर, 'लुडो'नंतर त्याच्या कारकिर्दीला चांगली उभारी मिळाली.

ऑस्कर विजेते अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे निधन

आगामी काळात येणाऱ्या नव्या चित्रपटात तो एका भ्रष्ट नेत्याची भूमिका साकारणार आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘दसवीं’ असे आहे, जो दिग्दर्शक तुषार जलोटा बनवत आहेत. चित्रपटाचे कथानक राजकारणाभोवती विणलेले आहे. असे असूनही हा चित्रपट चित्रपट करमणूक करणारा असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तो दहावी नापास मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षणाच्या महत्त्वावर जोर देण्यात येईल. अर्थात हा चित्रपट सर्वसामान्यांना हा संदेश देईल की, आपले राजकारणी नेतेही शिकलेले असावेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिल्ली ते आग्रा अशा अनेक ठिकाणांची निवड झाली आहे. या चित्रपटात अभिषेकसह यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कॉमेडियन मुनव्वर फारुकीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

यामीव्यतिरिक्त निम्रत कौर देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. पण तिच्या पात्राबद्दल अद्याप काही सांगण्यात आलेलं नाही. दसवीं चं शूटिंग 22 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकतं. अभिषेकला या चित्रपटाचे कथानक खूप आवडले. दसवींव्यतिरिक्त अभिषेककडे 'बॉब बिस्वास' आणि 'द बिग बुल' सारखे चित्रपट देखील आहेत. हे दोन्ही चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकतात.

संबंधित बातम्या