अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या केल्याचा आरोप

.
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

खरा प्रश्न सुशांतच्या निर्दयी हत्येचा आहे. महागडे वकील कायद्याच्या गुंतागुंतीमध्ये न्यायाचीही हत्या करतील का? इंग्रजांचे वारसदार असणाऱ्या या नकली लोकांवर विश्वास कसा ठेवायचा, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे, असेही सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी या पत्रात म्हटले आहे. 

मुंबई:  अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जवळपास दोन महिन्यांनी त्याच्या कुटुंबीयांनी आज प्रथमच नऊ पानी पत्र प्रसिद्ध केले. त्यात सुशांतच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात होत्या, असेही म्हटले आहे. सुशांतसिंहची निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि मुंबई पोलिसांवरही आरोप केले आहेत. 

खरा प्रश्न सुशांतच्या निर्दयी हत्येचा आहे. महागडे वकील कायद्याच्या गुंतागुंतीमध्ये न्यायाचीही हत्या करतील का? इंग्रजांचे वारसदार असणाऱ्या या नकली लोकांवर विश्वास कसा ठेवायचा, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे, असेही सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी या पत्रात म्हटले आहे. 

संजय राऊतांना नोटिस
पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा जवळचा नातेवाईक आणि बिहारचे भाजप आमदार नीरज कुमार बबलू यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना नोटिस धाडली आहे.  ‘सामना’ मधील सदरात राऊत यांनी सुशांतसिंहचे आपल्या कुटुंबीयांशी चांगले संबंध नव्हते. दुसऱ्या लग्नानंतर वडिलांबरोबरचे त्याचे संबधही ताणले गेल्याचा आरोप केला होता. ते बबलू यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणी राऊत यांनी ४८ तासांत माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा बबलू यांनी दिला आहे.
 
संबंधित बातम्या