कॅमेऱ्यासमोर ॲक्‍टिंग करणे आव्हानात्मक

अभिनय करताना थिएटर तसेच कॅमेऱ्यासमोर ॲक्‍टिंग करणे खूप आव्हानात्मक असते, असे मत ‘8 डाऊन तुफान मेल’ या सिनेमाच्या निर्मात्या आकृती सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कॅमेऱ्यासमोर ॲक्‍टिंग करणे आव्हानात्मक
Acting in front of the camera is challengingDainik Gomantak

पणजी: अभिनय करताना थिएटर तसेच कॅमेऱ्यासमोर ॲक्‍टिंग करणे खूप आव्हानात्मक असते, असे मत ‘8 डाऊन तुफान मेल’ या सिनेमाच्या निर्मात्या आकृती सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मी थिएटर क्षेत्रात काम करणारी आहे. आमचा मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. यात कोण सिनेमॅटोग्राफर, कोण पटकथा लेखक तर अन्य लोकांचाही समावेश आहे. या सर्वांच्‍या सहकार्याने आपण ‘8 डाऊन तुफान मेल’ तयार केला, अशी माहिती आकृती यांनी दिली.

Acting in front of the camera is challenging
पॅनोरमा विभाग परीक्षक मंडळ सदस्यांचा माध्यमांशी संवाद

आजचा काळ हा मोबाईल इझी झालेला असून प्रत्येकजण स्वःतशी निगडीत लहान-मोठे व्‍हिडिओ तयार करतो, त्याचे एडिटिंगही करतो, इफेक्टही देतो. तंत्रज्ञानामुळे हे सगळे सहज शक्य झाले. त्यामुळे भविष्यात सिनेमेसुद्धा मोबाईलवरच शूट होतील असेही त्‍या म्‍हणाल्‍या. मी माझा सिनेमा पैसे करण्यासाठी नव्हे तर वास्तववादी घटना मांडण्याच्या हेतूने तयार केला आहे, असे आकृती यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com