बॉलीवुडच्या सिंघमची बेयर ग्रील्ससोबत 'वाइल्ड लाइफ'
बॉलीवुडच्या सिंघमची बेयर ग्रील्ससोबत 'वाइल्ड लाइफ'Instagram/@ajaydevgn

बॉलीवुडच्या सिंघमची बेयर ग्रील्ससोबत 'वाइल्ड लाइफ'

डिस्कव्हरी प्लसने सोशल मिडियावर अजय देवगणच्या एपिसोडचा टीझर शेअर केला आहे.

जगातील अनेक मोठ मोठ्या जंगलामधून किंवा बेटावरून कोणतेही आधुनिक यंत्रांशिवाय बाहेर पडून दाखवणारा बेअर ग्रील्स (Bear Grylls) तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या 'इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स' या शोला अनेक प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बेअरच्या या शोमध्ये बरेच प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमारनंतर आता या शोमध्ये अजय देवगण (Actor Ajay Devgan) दिसणार आहे. अलीकडेच डिस्कव्हरी प्लसने सोशल मिडियावर (social Media) अजय देवगणच्या एपिसोडचा टीझर (Teaser) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Video) अजय देवगण विभिन्न स्टंट करतांना दिसत आहे.

टीझरमध्ये बॉलीवुडच्या सिंघमचे भन्नाट डायलॉग

अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये त्याने भन्नाट डायलॉग बोलले आहे. तो म्हणतो "हा मंच केवळ साहसी आणि धाडसी लोकांचा आहे. हा काही सोपा खेळ नाही. डिस्कव्हरी प्लसने अजयचा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की. 'जंगलात राहणे सोपे नाही.

बॉलीवुडच्या सिंघमची बेयर ग्रील्ससोबत 'वाइल्ड लाइफ'
'हम दो, हमारे दो' म्हणत राजकुमार राव आणि क्रिती सेनन सांगणार अनोखी कहाणी

बॉलीवुडच्या सिघंमने अल्टिमेट सरवायव्हल चॅलेंज स्वीकारले आहे. आता पाहूया तो हे चॅलेंज पूर्ण करेल का? बेअर ग्रील्ससोबत अजयच्या या भागाचा प्रीमियर डिस्कव्हरी प्लस अॅपवर 22 ऑक्टोबरला होणार आहे. तसेच हा एपिसोड 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉलीवुडच्या सिघंमनंतर विकी कौशल सुद्धा बेअर ग्रील्सच्या शोमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगणचे भूज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळाली होती. तो लवकरच मैदान आणि गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटला येणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com