'अभी तो मै जवान हूं' अभिनेते धर्मेंद्र यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल...

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 जून 2021

धर्मेंद्र अजूनही तंदुरुस्त आहेत, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे.

बॉलिवूडमधील(Bollywood) प्रसिध्द अभिनेते धर्मेंद्र(Dharmendra) यांनी आपल्या अफलातून अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत ठसा उमटविला आहे. धर्मेंद्र हे सोशल मीडिया (Social media) वर सक्रिय सक्रिय असतात. धर्मेंद्र यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते तलावात वॉटर एरोबिक्स (Water aerobics) करताना दिसत आहे. धर्मेंद्र अजूनही तंदुरुस्त आहेत, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी मजेदार कॅप्शन आपल्या व्हिडिओला दिले आहे. "मित्रांनो, देवाच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या शुभेंच्छा मिळाल्यामुळे मी योगा आणि वॉटर एरोबिक्स करण्यास  सुरुवात केली आहे. चांगले आरोग्य (Health) ठेवणे हा एक आयुष्याचा सर्वात उत्तम आशीर्वाद, आनंदी आणि निरोगी राहा,'' असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. (Actor Dharmendras video is going viral)

धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. यातच एका चाहत्याने गमतीदार कमेंटही केली आहे की, 'हे-मॅन' तुम्हाला का म्हटले जाते हे मला आज समजले.' तसेच इतर अनेक चाहत्यांनी धर्मेंद्र यांचे वर्णन एक मोठे प्रेरणास्थान म्हणून केले आहे. 

Birthday Special: रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांचे मामा होते सर्वोत्कृष्ट विनोदी...

आगामी काळात धर्मेंद्र 'अपने 2' सिनेमातून चाहत्यांना भेटणार आहेत. आहे. 'अपने 2' या चित्रपटात धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल असणार आहेत. अनिल शर्मा  (Anil Sharma) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अद्याप कोविड मुळे या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झालेली नाही. या आगोदर या तिघांने 'यमाला पगला दिवाना'  या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

संबंधित बातम्या