'गिता गोविंदम' मधील अभिनेता झळकणार करण जोहरच्या आगामी चित्रपटात

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

करण जोहरने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना  या  चित्रपटाविषयी  उत्सुकता  लागली  आहे. 

मुबंई:  बॉलिवूड  चित्रपट  निर्माता  करण  जोहर  नव्या  चित्रपटाची  घोषणा  करणार  असल्याचं म्हटलं  जात  होतं. त्यानंतर  आता  करणने आपल्या  नव्या  चित्रपटाची  घोषणा   केली  आहे. त्यामुळे चाहत्यांना  या  चित्रपटाविषयी  उत्सुकता  लागली  आहे. 

नुकतचं  करणने  चित्रपटाचे पोस्टर  सोशल  मिडीयावर  शेअर  केलं  आहे.  करण  सध्या  त्याच्या  आगामी  येणाऱ्या चित्रपटाच्या  तयारीत  व्यस्त  आहे.  चित्रपटाचे  नाव  हे ' ligar साला क्रॉसबीड' आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन  पुरी  जगन्नाथ हे करणार  आहेत.

चित्रपटात  मुख्य  भूमिकेत  दक्षिणात्य  सुपरस्टार   विजय  देवरकोंडा   आणि  अनन्या  पांडे   दिसणार  आहेत.  चित्रपटाची  निर्मिती  करण   जोहर   करणार  आहे.  हा   चित्रपट  हिंदी,  कन्नड,  तेलगू,  मल्याळम  या   भाषांमध्ये  प्रदर्शित   होणार   आहे.

अभिनेता  विजय  देवरकोंडा याने  यापूर्वी  'गिता  गोविंदम'  या  चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली होती.  करण जोहरच्या  या  आगामी  चित्रपटात  तो  फायटरच्या  रुपात आपणाला पाहायला मिळणार  आहे. त्याच्या  या  लूकचे  सोशल  मिडीयावर  खूप  होताना  दिसत  आहे.

संबंधित बातम्या