अभिनेते कबीर बेदी आत्मचरित्रामधून उलगडणार आयुष्य

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे.

बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते कबीर बेदी त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी देणार आहेत. कबीर यांचं आत्मचरित्र लवकरच त्यांच्या फॉलोअर्संना वाचायला मिळणार आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आलं. अभिनेते कबीर बेदी यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाईफ ऑफ अ‍ॅन अ‍ॅक्टर’  या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचं प्रकाशन 7 एप्रिल रोजी करण्यात आलं. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. वेस्टलॅंड पब्लिकेशन्सकडून हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल बोलताना कबीर म्हणाले, ‘’मुखपृष्ठासाठी वापरेला फोटो हा सत्तरच्या दशकात टेरी ओ निल या फोटोग्राफरेने काढलेला आहे.’’ तसेच कबीर यांनी पुस्तकामध्ये लिहलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. ‘बीटल्स’ची मुलाखत घेणे त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉंईट कसा होता याविषयी सांगितलं. ऑल इंडिया रेडिओ ते जहिरात क्षेत्र, तिथून नाटक आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीविषयी या त्यांच्या प्रवासाबद्दल कबीर यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे. तसेच कबीर यांनी आत्मचरित्रामध्ये आपल्या आई वडिलांविषयी सुध्दा लिहिलं आहे. या आत्मचरित्रावर एकादा चित्रपट किंवा वेबसीरीजही बनू शकते असंही ते म्हणाले. (Actor Kabir Bedis autobiography will unfold his life)

सना खान नंतर अजून एका कलाकाराने धर्मासाठी सोडला अभिनय

 कबीर बेदी यांच्या आत्मचरित्राबद्दल शुभेच्छा देताना सलमान खान म्हणाला, ‘’तुमचं व्यक्तिमत्व एक कलाकार आणि माणूस म्हणून खूप शुध्द आणि नितळ आहे. त्यामुळे या पुस्तकामध्ये जे काही असणार आहे ते तुमच्या मनातून आलेले असणार आहे. त्यामुळे तुमचं आत्मचरित्र वाचायला आनंद येणार आहे. त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून लोकांना बरच शिकायला मिळणार अशी आशा व्यक्त करतो.’’ 

 

 

 

संबंधित बातम्या