अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

Actor Kishor Nadanlaskar dies due to corona
Actor Kishor Nadanlaskar dies due to corona

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. यातच मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर(Kishor Nadanlaskar) यांचं कोरोनाने निधन झालं. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रटातून अभिनेते किशोर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (Actor Kishor Nadanlaskar dies due to corona)

किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका उत्तमरित्या करत असत. किशोर यांनी 1960-61 च्या सुमारास 'आमराई' या नाटकामध्ये त्यांनी काम केलं होतं. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’ ‘नथीतून मारला तीर’ ‘सुंदरा मनामध्ये भरली’  अशा नाटकांमध्ये काम केलं. 1980 च्या सुमारास ते दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com