अनोखं सेलिब्रेशन... मिंलिंद सोमणने वाढदिवशी पोस्ट केलेले फोटो बघून अचंबित व्हाल!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

 मिलिंद सोमणने आता आपल्य 55व्या वाढदिवसाला असेच काही करत चर्चेला उधाण आणले आहे. आपल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याने गोव्याच्या बीच वरचे फोटो इन्स्टाग्रॅमवर पोस्ट केले आहेत.

 पणजी- मिलिंद सोमण नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल होता. 54 वर्षाच्या मिलिंदचे सुपर मॉडेल मधु सप्रे सोबत साप गळ्यात घेऊन एका हॉट जाहिरातीतील न्यूड शूट प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. मिलिंद सोमणने आता आपल्य 55व्या वाढदिवसाला असेच काही करत चर्चेला उधाण आणले आहे. आपल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याने गोव्याच्या बीच वरचे फोटो इन्स्टाग्रॅमवर पोस्ट केले आहेत. मिलिंद आपली पत्नी अंकिता हिच्यासह गोव्यात हा वाढदिवस साजरा करत आहे.   

अभिनेता आणि मॉडेल असलेल्या मिलिंदने आपल्या इंन्स्टाग्रॅम वॉलवर फोट 2 फोटो पोस्ट केले आहेत ज्यात तो न्यूड रनींग करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो सुर्यप्रकाशाची किरणे अंगावर घेताना दिसत आहे. पत्नी अंकिताने काढलेल्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर बघितलं जात आहे. 55 वर्ष पूर्ण करणारा हा अभिनेता अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत आहे. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने #traveltuesday..'परत येऊन खूप छान वाटतंय, अवकाशाची वेळ आणि गोवा कायम छानच असतं', अशा आशय टाकत फोटो पोस्ट केले आहेत.  

संबंधित बातम्या