युट्यूबवर 'हा' अभिनेता सर्वात जास्त वेळा होतोय सर्च

ajay 3.jpg
ajay 3.jpg

गुगल (Google) वर रोज जगभरातील कोट्यवधी लोकांकडून अभिनेता,अभिनेत्रींना सर्च केलं जातं. तसेच युट्यूबवर (youtube) देखील त्यांना सर्च केलं जातं . सगळ्यात जास्त बॉलिवूडच्या (Bollywood) यादीत सर्च होणार अभिनेता माहित आहे का तुम्हाला, चला आम्ही तुम्हाला सांगतो कोण आहे तो,बॉलिवूडच्या यादीत 'सिंघम' म्हणजेच अजय देवगण(Ajay Devgan)  होय,अजय देवगणने या बॉलिवूडच्या यादीत बाजी मारली आहे. बॉलिवूडच्या सिंघम ला गेल्या 12 महिन्यात सर्वात जास्त सर्च केलं गेलं आहे.(This actor is the most searched person on YouTube)

या बॉलिवूडच्या यादीत अजय देवगण ला 'बजरंगी भाईजान' अर्थात सलमान खान (Salman Khan) शी टक्कर पाहायला मिळत आहे. बऱ्याच अभिनेत्यांना अजय ने मागे टाकलं आहे ,सलमान खान, अल्लू अर्जून, अमिताभ बच्चन आणि थलपती विजय याना टक्कर देऊन अजय ने बाजी मारली आहे.  या बॉलिवूडच्या च्या यादीत दुसऱ्या नंबर वर सलमान खान तर तिसऱ्या नंबर वर अल्लू अर्जुन चौथ्या नंबरवर महानायक अमिताभ बच्चन आणि पाच्या नंबर वर थलपती विजय आहे.  

दरम्यान अजय चा जानेवारी 2020 मध्ये  'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' (Tanhaji: The Unsung Warrior) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अजय च्या या तान्हाजी :द अनसंग वॉरिअर या सिनेमाला त्याच्या चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळला होता.या चित्रपटात अजयने तान्हाजी मालुसरे यांची मुख्य भूमिका साकारली होती या सिनेमाचे  दिग्दर्शित ओम राऊत हे होते. 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या सिनेमाने जगभरात 300 कोटीहून अधिक कमाई केली होती.तसेच अजय ने 'त्रिभंगा' आणि 'द बिग बुल' या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com