आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रकाश राज म्हणाले, महिला सशक्तीकरण म्हणजे...

Actor Prakash Raj tweeted congratulations on International Womens Day
Actor Prakash Raj tweeted congratulations on International Womens Day

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवशी स्त्रियांबद्दल आदर आणि प्रेम दर्शविला जातो. आणि या दिवसाचे महत्त्व म्हणजे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्तरावर महिलांना ओळखणे आणि स्त्रियांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करणे हे आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या या खास निमित्ताने प्रकाश राज यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी ट्विट करुन या दिवसाचे अभिनंदन केले आहे. "महिला सशक्तीकरण करणे म्हणजे या जगाचे सक्षमीकरण करण्यासारखे आहे," असे ट्विट प्रकाश राज यांनी आपल्या सोशल मिडियावरून केले आहे. प्रकाश राज यांचे महिलांविषयीचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, त्याचप्रमाणे यावर युजर्स तीव्र भाष्यही करीत आहेत. आपल्या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिले की, "जिथे आपण राहतो त्या जगात महिला सशक्तीकरण करणे गरजेचे आहे...त्यांचा फक्त आजच नव्हे तर रोजच आदर करण्याची गरज आहे ... आपल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद ..."

त्याचबरोबर अभिनेत्री मीरा चोप्रा यांनीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ट्वीट केले आणि लिहिले की, "सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, महिलांनी कोणत्याही प्रकारची असुरक्षितता न बाळगता स्त्रियांना सामर्थ्य देत हरा. त्या पुरुषांना पण शुभेच्छा ज्यांनी महिलांना सशक्त बनविले,” असे ट्विट मीरा चोप्रा ने केले आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनावर प्रकाश राज आणि मीरा चोप्रा व्यतिरिक्त कंगना रनौत आणि माधुरी दीक्षित यांनीही ट्विट केले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी कंगना रनौतने आई, बहीण सोबतचे फोटोही शेअर केले होते. तिकडेच माधुरी दीक्षित यांनी लिहिले की माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिलेल्या आणि सतत मला प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांचे माझे आभार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com