अभिनेता आर माधवन चा डी लिट पदवी देवून सन्मान

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

अभिनेता आर माधवनला डॉक्टर ऑफ लेटर (डी लिट) ही पदवी देवून सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरच्या डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांना हा सन्मान देण्यात आला.

कोल्हापूर: अभिनेता आर माधवनला डॉक्टर ऑफ लेटर (डी लिट) ही पदवी देवून सन्मानित करण्यात आले. कोल्हापूरच्या डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांना हा सन्मान देण्यात आला. काल बुधवारी डी वाय पाटील सोसायटीचा 9 वा दीक्षांत समारंभ झाला. ज्यामध्ये माधवन स्वत:हजर होते. सोसायटीचे ट्रस्टी रुतुराज पाटील यांची पोस्ट शेअर करत माधवनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे. 

"नव्या संशोधनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, कृत्रिम बुद्धीमत्तेने आणि रोबोटिक्‍सच्या नवनव्या प्रयोगामुळे आरोग्य क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलला. आधी अशक्‍य वाटणाऱ्या शस्त्रक्रिया आता शक्य होऊ लागल्या आहेत. असे असले तरी उत्तम उपचार सर्वसामान्यांना परवडले पाहीजे. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखीत झाले. ही व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान तुम्ही स्विकारा," मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विजय खोले यांनी  विध्यार्थ्यांना असे आवाहन केले आहे.

वैद्यकीयशास्त्राशी संबंधीत विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेता आर.माधवन, गीतकार, शाहीर कुंतिनाथ करके-पाटील यांचा डिलीट पदवी देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर एअर मार्शल अजित भोसले यांना डी.एस पदवीने गौरवण्यात आले.

 

संबंधित बातम्या