अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

राज कपूर यांचे चिरंजीव व अभिनेते राजीव कपूर यांचे (वय 58) आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुंबई : राज कपूर यांचे चिरंजीव व अभिनेते राजीव कपूर यांचे (वय 58) आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव कपूर यांनी राम तेरी गंगा मैली, हम तो चले परदेस अशा चित्रपटांत काम केले होते. अभिनेते ऋषी कपूर, रणधीर कपूर यांचे ते बंधू होते.

राजीव यांची मेव्हणी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवरुन त्यांच्या निधनाची बातमी दिली. राजीव यांनी 1991 मध्ये हिना या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रेमग्रंथ आणि आ आब लौट चले या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. राजीव कपूर आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटातून 28 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार होते. संजय दत्त या चित्रपटात प्रमुख भूमीका करणार होते.

संबंधित बातम्या