सिनेसृष्टी हादरली; आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या   

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

केसरी आणि एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी मधील अभिनेता संदीप नहारने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची माहिती मिळाली आहे.

केसरी आणि एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी मधील अभिनेता संदीप नहारने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची माहिती मिळाली आहे. संदीप नहारने सोशल मीडियावरील फेसबुकवर आपण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट शेअर केली असून, यासोबतच एक व्हिडिओ देखील त्याने पोस्ट केलेला आहे. संदीपने यापूर्वी अक्षय कुमारच्या केसरी व सुशांत सिंग राजपूतने अभिनय केलेल्या एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात काम केले होते. यातील सुशांत सिंग राजपूतने मागील वर्षाच्या 14 जून रोजी आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आणि त्यानंतर आता संदीप नहारने देखील आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. 

संदीप नहारने मुंबईतील गोरेगाव भागात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी मुंबईतील आपल्या संघर्षाची गोष्ट सोशल मीडियावरील फेसबुकवर पोस्ट केली आहे. आणि यासह त्याने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केलेले आहे. बॉलिवूडमधील जीवन हे संपूर्णपणे खोटे असल्याचे त्याने आपल्या या पोस्ट मध्ये लिहिले आहे. याशिवाय आयुष्यात बरेच सुख आणि दु:ख पहिले. व प्रत्येक प्रॉब्लेमच सामना केला. मात्र आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्याचे संदीपने पोस्ट मध्ये लिहिले आहे.

‘संघर्षाच्या काळात वडिलांनी मदत केली नाही’

तसेच आत्महत्या करणे बरोबर नसल्याचे माहिती आहे. आणि आपल्याला जगायचे होते. परंतु रिस्पेक्ट, समाधान नाही मग जगण्याचा फायदा नसल्याचे त्याने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. याव्यतिरिक्त आपली वाइफ कांचन आणि तिची आई यांनी कधीच आपल्याला समजून घेतले नसल्याचे संदीप नहारने आपल्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे.

संदीप नहारच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी अजून तरी आत्महत्येच्या कारणाबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.        

संबंधित बातम्या