अभिनेता सयाजी शिंदेचा नवा संकल्प
सयाजी शिंदे यांनी येत्या शिवजंयतीला प्रत्येक गडावर 400 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.
सातारा: प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे आपल्या सामाजिक कार्यासाठी सदैव चर्चेत असतात. आताही अभिनेता सयाजी शिंदेने शिवजंयती निमित्त केलेल्या नव्या संकल्पासाठी चर्चेत आहेत. शिंदे यांना वृक्षारोपण करण्यासाठी आग्रही भूमिका घेत आसताना आपण त्यांना पाहिले आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम घेताना आपण त्यांना पाहिले आहे.
सयाजी शिंदे यांनी येत्या शिवजंयतीला प्रत्येक गडावर 400 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरवी मशाल दिसली पाहिजे, असे आवाहान देखील सयाजी शिंदे यांनी केले आहे. त्याचबरोबर ते स्व:ता पन्हाळागडावर जावून वृक्षारोपण करणार आहेत.
टॉलिवूडच्या सुर्या सिंघमला कोरोनाची लागण
''छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्य़ाखोऱ्यात स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिले होते. त्यांच्या सोबतीला दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांनी महाराजांना साथ दिली होती. त्यांना सह्याद्रीतील झाडांनाही त्यांना खूप साथ दिली होती. सह्याद्रीच्या प्रत्योक झाडाचीही स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा होती. मात्र आजच्या काळात आपण सह्याद्रीला बोडका केला आहे. रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही असा महाराजांनी पायंडा पाडला होता. वृक्ष म्हणजे रयतेची लेकरे आहेत, असं छत्रपती शिवाजी महाराज तळमळीने सांगत होते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. येत्या शिवजंयतीला आपण 400 झाडे किल्ल्यांवर लावणार आहोत. आपण सर्वजण गडावर मशाल घेवून जावूयात. मात्र ही मशाल हिरवी मशाल असणार आहे.... कारण आपल्या गडकिल्ल्यांना वृक्षांशिवाय शोभा नाही’’ असे अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणासाठी आग्रही भूमिका घेत पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत असतात.