कोरोना रूग्णांच्या मदतीतही खान 'किंग'च

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

शाहरूख खानला बॉलिवूडमध्ये किंग खान म्हटलं जातं. त्याच्या नावाला साजेसं कामही त्यानं केलं असल्यामुळे तो कायमच अनेकांचा फेवरेट राहिला आहे. यावेळीही त्याने त्याच्या चाहत्यांना अभिमान वाटावा, असे काम केले आहे.

नवी दिल्ली- शाहरूख खानला बॉलिवूडमध्ये किंग खान म्हटलं जातं. त्याच्या नावाला साजेसं कामही त्यानं केलं असल्यामुळे तो कायमच अनेकांचा फेवरेट राहिला आहे. यावेळीही त्याने त्याच्या चाहत्यांना अभिमान वाटावा, असे काम केले आहे. दिल्लीतील कोरोना रूग्णांसाठी त्याने 500 रेमेडीसिवीर इंजेक्शन दान केले आहेत. 

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ही स्वत: ही माहिती दिली आहे. जैन यांनी शाहरूख आणि त्याचे मीर फाऊंडेशन यांना टॅग करून बिकट परिस्थितीत त्यांनी 500 रेमेडीसिवीर इंजेक्शन दान केल्याबद्दल आपण यांचे आभारी आहोत, असे म्हटले आहे. 

देशात आलेल्या कोरोना लशीवर अजून शिक्कामोर्तब झालेले नसून रेमेडीसिवीर वापरण्याचे आदेश याआधीच दिलेले आहेत. मात्र, अतिगरजेच्या वेळीच ते वापरले पाहिजेत असे सांगण्यात आले आहे. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली असून मृत्यूदर कमी तर होत आहेत. मात्र, रूग्ण संख्या अजूनही कमी होत नाही. 

शाहरूख खान पहिल्यांदाच अशा प्रकारचे काम करत नसून याआधीही त्याने एप्रिलमध्ये कोलकाता नाइट राइडर्स, रेड चिलीज एन्टरटेन्टमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिलिज वीएफएक्सच्या चार कंपन्यांच्या माध्यमातून रिलीफ फंड दान केला आहे. ज्यात पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंड यांचा समावेश आहे.   

संबंधित बातम्या